Human beings are the worlds most intelligent creature. science has developed lot. we have achieve many things and Great inventions done through science. Even after such great development we cant forget God. The only thing we cant beat is God and He is the last option for us.
मनुष्य जन्म:कितीही स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण झाला असला तरी युगानुयुगे त्याला संघर्ष करूनच विकासा कडे जावे लागते. बुद्धीचा वापर करून अनेक गोष्टींची निर्मिती आपल्या गर्जे नुसार त्याने करून घेतली. विज्ञानाच्या माध्यमातून अनेक असाध्य अशा बाबी साध्य केल्या. आज मानव जग मुठीत घेऊन आहे भौतिक प्रगतीत भला मोठा पल्ला त्याने गाठला असला तरी प्रकृतीतील पंचमहाभूता समोर हि प्रगती अगदीच छोटी असल्याचे प्रत्यय आपल्याला प्रलय, भूकंप, अचानक व भयानक असे महापूर, वादळी प्रकोप अशा भयंकर नैसर्गिक आपत्या आपण बघतच आहोत.काळ केव्हा, कुठे आणि कुणावर अचानक झडप घालेल या बाबत विचारच करू शकत नाही. हि प्रकृती तर मानवाला चांगलीच होरपळून काढते. अशा परिस्थितीत संकटात सापडलेला माणूस फक्त एकच करू शकतो ते म्हणजे परमेश्वराचा धावा. भगवंताला प्रार्थनेच्या स्वरूपात आळवून आपले गाऱ्हाणे विनंतीच्या स्वरूपात प्रगट करून या संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग सुचविण्यास मदत मागतो. हा धावा त्यावेळेला अगदीच आंतरिक मनातून प्रगट होत असतो.परंतु मानवाचा नैसर्गिक स्वभावामुळे एकदा का तो या मार्गातून सुखरूप बाहेर पडला कि मग पुन्हा परमेश्वराचा धावा करण्यास तुरंत विसरून जातो.
Article By Marathi Unlimited
The post शेवट परमेश्वराकडेच धाव appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.