Quantcast
Channel: मराठी लेख वाचकांसाठी : Marathi Articles Sangrah | lekh, education, love, social, life, health, astrology, kids, youngsters, media., mother
Viewing all articles
Browse latest Browse all 396

सत्संग कोणासाठी?

$
0
0

Satsang is the fruit of all religious and devotional practices. Satsang is being in the company of the highest truth with an awakened teacher and a gathering of seekers who investigate their true nature.  satsang is Sat = True and Sang = Company it also defines satsang as ”Company of the highest Truth. Read more about Satsang in Marathi In below article.

Satsang is the fruit of all religious and devotional practices

Satsang is the fruit of all religious and devotional practices

नर जन्म प्राप्त झाले कि सत्संग हा धरावाच लागतो. सत + संग सत म्हणजे सत्य जो भूत- वर्तमान- भविष्य या तिन्ही काळात एक समान, एकरस असणारा सत्य नारायण किंवा परमेश्वर तर संग म्हणजे संगत एकंदरीत सत्संग म्हणजे सत्य स्वरूप परमात्म्याचा सहवास होय यालाच सत्संग म्हणतात. जन्म-जन्मातराच्या संचित पुण्याच्या बळावर या शुद्र जीवात्म्याला आता मानव जन्म मिळाला आहे हेच मानवी जीवन आजची सुवर्ण संधी समजावी. ती या अनेकानेक जन्म-मृत्युच्या शृंखलेतून स्वत:ला मुक्त करण्याची! ईश्वराकडे जाण्याचा सन्मार्ग हा संत, सद्गुरू, सज्जन यांच्या पावन सानिध्यात प्राप्त होत असतो. सत्संग हि अध्यात्मिक ज्ञान देणारी पाठशाळा आहे, तेच सुसंस्कार केंद आहे. हेच संतांचे माहेर आहे, कैवल्य धामही आहे. तसेच देव, सद्गुरू व संत यांच्या एकत्रित भेटीचे एकमेवद्वितीय स्थान सुद्धा आहे, येथे स्वत:तील खोट, अवगुण, कमीपणा व दृष्टकृत्यांची कबुली देऊन या पुढे सद्वर्तनी होण्यासाठी आशीर्वादाची कामना केली जाते. ईश्वर प्रेम कोणत्याही शुभ कार्याचा श्रीगणेशा सत्संगाच्या आयोजनाने करतात.

१) सर्वसाधारण सत्संग -यामध्ये सर्व गटातील नर-नारी भाग घेतात. यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. सत्संगाचा  परमानंद घेण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. सत्संगात कोणीही आपल्याला पदाधिकारी समजत नाही. सत्संगात प्रत्येक व्यक्ती तो परमेश्वराचे दिव्यरूप आहे. ईतरांना महानता देवून स्वत:दास भावना बाळगतो. आपल्यातील अहंकाराला दाबून टाकतो. येथे विचार, भाव, आत्मनिवेदन, भक्तिगीते किंवा आपल्यातील कलाकौश्ल्य, प्रगट करण्यासाठी सर्वांना समान संधी मिळते.

२) पुरुष सत्संग – या प्रकारातील सत्संगात सर्व प्रौढ पुरूषांनासहभागी होण्यासाठी भाग पाडले जाते  पुरुष- पुरूषां मधील नाते सबंध अधिक दृढ व्हावे व एकमेकांच्या आदर सत्कारांचीभावना वृद्धिगत व्हावी यासाठी आदेश दिले जाते.

३) महिला सत्संग – यातील सर्व सत्संग कामगिरी माता-भगिनी करतात आपसात प्रेम, ममता, वात्सल्य, सहनशीलता, ऋणानुबंध, व नाते सबंध बळकट होण्यासाठी. मायलेक-सत्संग, सासु-सुन सत्संग, भावजय – नणंद सत्संग हेही सत्संग घेण्यात येतात.

४) युवा सत्संग – नवनिर्माण क्षमता,उतुंग-आत्मविश्वास,शारीरिक-सुधृडता,शक्ती या वयोगटात साठून असतात त्या शक्तींना योग्य वळण दिशा किंवा संस्कार मिळणे अतिशय महत्वाचे असते. हे न मिळाल्यास फार मोठा अनर्थ घडू शकतो म्हणून युवा वर्गाला सत्संगाच्या माध्यमातून देश भक्त, ईश्वर-भक्त, समाज सेवक,राजकारणी किंवा शास्त्रज्ञ इ. घडवू शकतात मानवी जीवनातील हि सृजनक्षम अवस्था आहे यात शास्त्राभ्यास, सेवाकार्य, ज्ञान, विज्ञान, नवनिर्माण संशोधन, रचनात्मक कार्य इ. आवड निर्माण करून कृतिशीलता वाढीस लावता येते. या करीता युवक-युवतींना सुयोग्य संगत मिळणे अति आवश्यक असते, याकरिता युवा सत्संग महत्वाचे ठरते.

५) बाल-सत्संग – सुज्ञ पालक आपल्या काळजाच्या तुकड्यावर, लाडक्या पुत्र- कन्येवर योग्य संस्कार पडावेत त्यांच्यात आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी सभा धीटपणा, वाक चातुर्य इ. सद्गुण यावेत त्यांची क्लासेस लावावेत.

 आई -वडिला सोबत बालकेही आपल्या सुंदर सुखी जीवनाच्या भविष्याचे स्वप्न रंगवीत असतात स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सुसंगती लाभणे तितकेच महत्वाचे असते. एका बाल सत्संगात एका चिंतनशील बालकाने आपले आंतरिक भाव प्रगट केले ते असे प्रत्येक आई- बाबांना आपली मुले भविष्यात नामवंत इंजिनीअर, डॉक्टर, वकील, शिक्षक, सैनिक, अधिकारी कवी, लेखक इ, अशीच इच्छा बाळगतात व त्यासाठी प्रयत्न सुद्धा करतात. पण आपला मुलगा एक सात्विक मनुष्य बनावा तो संत- सज्जन देव पुरुष व्हावा हि इच्छा कधीच केल्या जात नाही. का? तर देवच जाणे ? तेव्हा बाल सत्संगाच्या द्वारे मुलांना मनन, चिंतन, सारासार विवेक उमगू लागते. विचलित,बेलगाम,बावरा व चंचल मन एकाग्र करून या निर्णयाप्रत पोचता येते.

माजी राष्ट्रपती भारतरत्न अब्द्दुल कलाम म्हणतात कि स्वप्न म्हणजे ते नव्हे जे तुम्ही झोपेत असताना बघता,तर स्वप्न म्हणजे ध्येय हे धेय्य तर आपली झोपच उडवून टाकते. तर याचे सुद्धा बालक सत्संग हे भाग असून संस्कार क्षम वर्ग निर्माण झालेले आहेत. तेव्हा ते कोणत्याही धर्म संप्रदायातील असो तेथे जावून सतसंगाचा अलक्ष लाभ अवश्य घ्यावा, त्याची माहिती ईतरांनाहि द्यावी. सत्संग हे फक्त संपूर्ण मानव जातीसाठीच आहे हे लक्षात घ्या. सत्संग मिळणे याहून अहो भाग्य कोणते ? म्हणून संतांनी देवाला साकडे घातले कि हे देवा मला मानवाच्या जन्मास पाठवितो हे ठीक आहे परंतु तेथे मला सदैव ‘सत्संग’ लाभेल अशी तजवीज कर आणि मगच पाठव! म्हणून म्हणतात -  हेचि दान देगा देवा |तुझा विसर न व्हावा ||

The post सत्संग कोणासाठी? appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


Viewing all articles
Browse latest Browse all 396

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>