संत चोखामेळा
चोखामेळा हे मंगळवेढ्याचे. जन्मभर उच्चवर्णीयांकडून अहवेलनेची वागणूक मिळत असतांनाही त्यांनी भगववंतनामाचा कधीही त्यांनी त्याग केला नाही वाटाल्या आलेले कष्टमय जीवन त्यांनी भगवंताच्या नामजपाने सुसह्य केले. केवळ स्वतः नव्हे तर पत्नी, मुलगा, बहीण मेहुणा या कुटुंबातील सर्वांनाच विष्णुभक्तीची ओड लागली. नामदेवाच्या कुटुंबाप्रमाणे चोखोबांचेही सर्व अभंगांतून त्यांच्या जीवनाचे तरल दर्शन प्रतिबिंबित होऊन राहिले आहे. वाट्याल्या आलेली दिनावस्था, भक्तीची आर्तता आणि मनाची व्याकुळता या साऱ्या छटा त्यांचा सहज प्रासादिक अभंगातून स्पष्ट होतात.
‘ऊस डोंगा परी सह नोहे डोंगा, काय भुललासी वरलीये रंगा ।’ असे ते स्पष्टपणे म्हणत. संत चोखामेळा हे मंगळवेढे येथे गावकूस बांधण्याच्या कामावर राबत असतांना एकाएकी बांधलेली भिंत धडधड कोसळून खाली आली. चोखोंबाच्या अंगावर दगड मातीचा ढिगारा साचला. ढिगाऱ्याखाली गाडले गेले असतांना सुधा मुखी विठ्ठलनामाचा जप करीत ते वैकुंठनामाचा जप करीत ते वैकुंठात विलीन झाले.
असे भगवतभक्तींच्या प्रेरणेने भारावून वैकुठत विलीन होणाऱ्या चोखोबांची पंढरपुरात समाधी बांधण्यात आली आहे.
The post संत चोखामेळा ( Sant Chokha Mela ) appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.