Quantcast
Channel: मराठी लेख वाचकांसाठी : Marathi Articles Sangrah | lekh, education, love, social, life, health, astrology, kids, youngsters, media., mother
Viewing all articles
Browse latest Browse all 396

पर्यावरण आणि पशु-पक्षी…

$
0
0

Effects of Environmental Pollution On Birds :

Noise pollution affects both health and behavior of birds. Unwanted sound can damage psychological health. Noise pollution can cause migration of birds from one place to another place.

Effects of Environmental Pollution On Birds

आली कडे अवकाशात विमानांच्या फेऱ्या वाढल्यात. मोठ-मोठ्या आवाजांचे स्फोट होतात. त्यामुळे पशु-पक्षांच्या दैनंदिन जीवनात या सर्वांचा परिणाम झालेला दिसतो. पशु-पक्षांची मानसिक व भावनिक क्षति ढासळलेली आहे. मोठ्या प्रमाणात मोठमोठी फोकस दिवे लावली जातात. यामुळे तो तापमान व प्रकाश यांचाही विपरीत परिणाम पक्षी जीवनावर होत आहे. या बद्दल सावधानता बाळगणे हि काळाची गरज आहे. त्यांना पुरेशी विश्रांती मिळत नाही. प्रचंड प्रमाणातील निसर्गातील ध्वनी तापमान, गोंगाट वाहनांचा आवाज,  वाढते ध्वनीप्रदूषण यामुळे पक्षी जीवनास अस्वस्थता व भीती निर्माण होत आहे. शिकार करू नका असा कायदा असला तरी  हौसे-गौसे पशु -पक्षांची शिकार ती करतातच.  त्या मुळे त्यांना सतर्क रहावे लागते.  या बाबींवर कडक नियंत्रण हवे.

 रात्रीच्या वेळी पशु भक्ष शोधार्थ सडकेवर येतात तेव्हा अशा  वेळी वाहनांच्या धडकेने अनेक पशु मृत्यू पावतात. आणि प्रदूषण युक्त पाणी, प्रदूषण युक्त दवा त्यांच्या जीवनाला घातकच, तसेच विजेच्या तारा,  ध्वनी लहरी यामुळे हि त्यांचे अपघात होतात. तसेच वाढत्या प्रदुषणाने त्यांच्या प्रजनन क्षमतेवर फार मोठा परिणाम झालेला दिसून येतो, त्यांच्या घटत्या संख्येचे हे एक कारण आहे.  या सर्व प्रकारच्या वाढत्या प्रदुषणाने पशु-पक्षी भावनाहीन बनत आहे. त्यांच्या लैंगिक वृत्तीवर विपरीत परिणाम दिसून येतो. त्यामुळेही प्रजनन संख्या घटली.  पर्यावरणातील मानवी बदल यामुळे पशु-पक्षी यांच्या जीवनात  मोठी स्थलांतर होत आहेत.  यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे.  तेव्हा या भूतलावर मानवाने वेळीच सावध होऊन निसर्गाची छाटणी थांबवावी, निसर्गाचा ऱ्हास थांबवावा व प्रदूषण कमी करावे.  म्हणजेच पशु-पक्षांना अभय मिळेल. निसर्गाचा समतोल राखल्यास मानवी जीवन सुखी संपन्न  करण्यास सहाय्य होईल.

 

The post पर्यावरण आणि पशु-पक्षी… appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


Viewing all articles
Browse latest Browse all 396

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>