How to become a master guarded –
This article defines the general saying ” Tit For Tat” that is an equivalent to an action given in return.
” शुद्ध बिजा पोटी फळें रसाळ गोमटी ” या उक्ती प्रमाणे जसे बीज तसे फळ. या प्रमाणेच मानवाची स्थिती आहे. जसे विचार असतील तसेच तशीच संतती. विचार म्हणजे शरीरात जसे दिव्य तत्व विद्यमान असतील तेच. संत याच विचाराला मन,बुद्धी,चित्त आणि अंतःकरण म्हटले आहे. मनुष्याचा विकास, आणि जीवन त्याच्या विचारांच्या आधारित असल्यामुळें प्रथम आई-वडीलां द्वारे आणि बाल वयातील शिक्षणाद्वारे संस्कारित करावयास हवे. विचार तसेच कर्म, त्यावरच परिस्थिती अवलंबून असते. ज्ञान -विज्ञान युक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून अनासक्त होऊन कर्म करावे. हे मानायला सोपे वाटते परंतु चांगले कर्म करण्यास भरपूर साधना हवी असते. आपले विचार विस्कळीत होऊ नये यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक मार्ग संतांनी सांगितली असली तरी भक्ती मार्ग हा श्रेष्ठ मार्ग असल्याचे संत सांगतात. भक्ती मार्गाचे अध्ययन करण्यामागे एकच तथ्य असते कि आपले विचार संस्कारित व्हावे यासाठी जीवनात संयमाची गरज आहे. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होऊ शकत नाही. संयम हा संस्कृतीचा आत्मा आहे. याशिवाय इंद्रिय संयम , धन – संयम, वेळ – संयम, आणि विचार – संयम, याचे काटेकोर पालन करावे. संयम पाळणारा खरा गृहस्थाश्रमी असून आजन्म ब्रम्हचर्याचे पालन करणारा व संयम ठेवणारा म्हणजे ‘महात्माच’ असू शकतो.
मनुष्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊन आत्मोन्नती करून घ्यायची असेल तर बहुमोल तत्व – गुणांचा उपयोग जीवनात केला पाहिजे. यांत विनयशीलता, उद्यमशीलता धैर्यवान, परोपकार, बुद्धी, न्यायनिती आणि आत्मसंयमाचा सामावेश केला पाहिजे. यामुळे मनुष्याला अखंड दिव्य वैभव प्राप्त होते. जगातील कोणत्याही भौतिक दृष्ट्या मोहक- मायावी विषयांना न विसरता मनावर संयम ठेवता येतो. विषय भोगाच्या नाजूक जाळ्यात गुरफटण्यासाठी उत्तेजित व प्रेरित होणे हीच धोक्याची धडी होय. अश्या वेळी मनुष्याने आत्मसंयमाने आपल्या सद्विवेक बुद्धीला पूर्णपणे सावध व लक्ष केले पाहिजे. आजची नवी पिढी बहुतांश व्यसनात आणि विषयात गुरफटलेली दिसून येत आहे. तरुण पूर्णपणे निःसत्व, नारबा, निस्तेज, निरुसाही व निष्क्रिय बनत आहे. त्यामुळे स्वास्थ्य व आरोग्य बिधडून तो रोगी बनतो. म्हणून तरुण पिढिलासी सर्वात जास्त गरज आत्म संयमाची आहे.
The post संयमाचे धनी कसे व्हाल !(भाग १) appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.