Quantcast
Channel: मराठी लेख वाचकांसाठी : Marathi Articles Sangrah | lekh, education, love, social, life, health, astrology, kids, youngsters, media., mother
Viewing all articles
Browse latest Browse all 396

मानवतेचे पुजारी

$
0
0

 The priest of humanity :

This is a marathi article which tells us the real meaning of humanity by Sant Tukoba.

The priest of humanity

उत्तमची गती , तो एक पावेल , उत्तम भोगील जीवखानी ||

दररोज नवनवीन शोध हा मनुष्याचा गुणधर्म आहे. त्यामुळे कितीतरी शोध मानवाने लावलेले आहेत. सुरवातीची जीवन शैली व आताची जीवनशैली बघितल्यास फरक जाणवतो. त्यातूनच मनुष्य जीवनाच्या बांधणीला अधिकाधिक  योजकतापूर्वक  वागून संस्कृतीची निर्मिती होऊ लागली. परंतु मानवी विकासात समता हे केंद्र स्थानी असलेले मूल्य आहे हे आपल्या लक्षात येते . खऱ्या अर्थाने ती एक व्यापक संकल्पना आहे. समतेचे मूल्यं मानवी मनात रुजविणे हेहि तेवढेच गरजेचे असते परंतु हि बाब लक्षात येण्याकरिता खूप मोठी साधना लागते. हि साधना म्हणजे आधुनिक युगातील अवतारी पुरुष म्हणजेच संत होत. अनेक जाती-धर्माना , रंजल्या-गांजल्यांना, श्रीमंत-गरिबांना एकत्रित आणण्याचे कार्य संत तुकोबांनी आपल्या अभांगातून समाजाला समजावून सांगितले आहे. सेवेत खरा देव आहे असा उपदेश करणारे संत तुकोबा !  यांनी आपले जगणे कृतार्थ केले त्यांच्या कडे सामान्य लोक आदर्श म्हणून पाहतील.

कर्म म्हणजे स्वतःच्या चारित्र्याचा आदर्श लोकांपुढे ठेवून साधावयाची लोकसेवा. हेच समजावून  ते मानवतेचे पुजारी ठरले.

जातीजातीत भेदाभेद , पूर्वग्रह-दूषित मतप्रवाह, संघर्ष, मतभेद, हे सर्व नष्ट व्हावे. सर्व मानव जात गुण्यागोविंदाने नांदावेत त्याच बरोबर अंधश्रद्धा, दुष्टरूढि, यावर प्रहार करीत सन्मार्ग दाखविण्याचा प्रयत्न हे सर्व त्यांनी आपल्या अभांगातून समजाविले आहे.

संसार, प्रपंच हे त्यांना वावडे नव्हते होती ती फक्त त्याबद्दलची आसक्ती त्याच बरोबर निर्भय जगण्याची प्रेरणा दिली. परिस्थितीत मन खम्बिर व सज्जन वृत्ती टिकवून ठेवण्यास उपदेश केला. त्यांनी संसार त्यागाची मार्गदर्शन कधीच केले नाही. त्याउलट ”अवघाचि संसार सुखाचा” कसा होईल, परिस्थिती वर मात करून स्वतःला कसे सावरायचे हेही त्यांनी समजाविले आहे. समाजाला एक नवी दृष्टी देण्याचे कार्य व मानवतावादी-व -प्रगतिशील विचारसरणी पेरण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

The post मानवतेचे पुजारी appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


Viewing all articles
Browse latest Browse all 396

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>