Quantcast
Channel: मराठी लेख वाचकांसाठी : Marathi Articles Sangrah | lekh, education, love, social, life, health, astrology, kids, youngsters, media., mother
Viewing all articles
Browse latest Browse all 396

आरोग्य –आजार

$
0
0

Health – Disease :

In today’s environment of increased pollution few things impact your life more than a serious health problem. Dengue fever is a painful, incapacitating mosquito-borne infection brought about by dengue viruses.

Health - Disease

आजच्या या वातावरणात प्रदूषणामुळे म्हणा किंवा अस्वच्छतेमुळे जिकडे तिकडे डासांचे प्रमाण वाढले आहेत, आणि हे डांस आपल्या आरोग्याला घातक असतात. डेंग्यू हा एक डासां मार्फत (डासांचे नाव एडिस इजिप्ताय ) पसरणारा विषारजन्य आजार आहे. ताप येणे व अत्यंत अंग दुखी, त्वचेवर पुरळ हि त्याची प्रमुख लक्षणे आहेत. तसा तो आपोआप चार ते पाच दिवसात बरा होतो. परंतु काही रुग्णांमध्ये तो अति गम्भीरता निर्माण करतो .त्याचे दोन प्रकार आहे (डेंग्यू मरेजिक ताप DHF  आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम DSS  )

सुमारे 25% रुग्ण अगदी तातडीची व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळूनही दगावतात. जगात 110 देशांमध्ये डेंग्यू आढळतो व डासांमुळे प्रसारित होणाऱ्या आजारांमध्ये मलेरिया नंतर डेंग्यूचा दुसरा क्रमांक आहे.

 डांस चावल्यापासून चार ते पाच दिवसांनंतर ताप, भयंकर अंगदुखी व अशक्तपणा येतो,  मळमळ होते व नंतर बऱ्याच रुग्णांना अंगावर गोवरा सारखे पुरळ येतात. बरेच 95% रुग्ण बरे सुद्धा होतात,  परंतु 5% रुग्ण DHF किंवा DSS ने अति गंभीर होतात.

 DHF  मध्ये बिंबींकांची संख्या (प्लेटलेटस) प्रचंड प्रमाणात कमी होऊन नाक, तोंड, फुफ्फुसे, मूत्रपिंड, मेंदू,  कातडी इत्यादींत रक्त स्त्राव होऊन रुग्ण  गंभीर होतो. DSS मध्ये रक्त घटक रक्त वाहिन्यामधून बाहेर पाझरून अंगावर सूज येते.  पोट व छातीत पाणी साठते  व रक्तदाब कमी होऊन प्रकृती गम्भीर स्वरूप धारण करते. हे दोन्ही गम्भीर प्रकार लहान मुले, वृद्ध, गर्भवती, मधुमेही, स्टिरॉइड घेणारी व्यक्ती  यांना जास्त संभवतात.  याची लक्षणे म्हणजे 1) कातडीवर रक्ताडलेले डाग. 2) रक्तस्त्राव 3) अति झोप येणे 4)  दम लागणे, सतत उलट्या, पोटदुखी 5) अंगावर सूज 6) शरीर थंड पडणे, रक्तदाब कमी होणे. इ.  डेंग्यूचे रोग निदान निश्चित करण्यासाठी हिमोग्लोबिन, P C V ,  प्लेटलेट्स ची संख्या

N S I , I J M व  I G G , एलायझा इ. चाचण्या करतात व डेंग्यूला लागू पडणारे विशिष्ट औषध अद्याप देणे नाही.

 डेंग्यू चे डांस स्वच्छ दिसणाऱ्या पाण्यात, अडगळीत, टायर ट्यूब, घरातील पडीक वस्तू, दलदल इ. मध्ये  निर्माण होतात. त्यांना प्रतिबंध म्हणजे स्वच्छता व दक्षता यांनीच करता येतो. गप्पी मासे या डासांच्या अळ्यांना खातात म्हणून ते पाण्यात सोडावे.

The post आरोग्य – आजार appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


Viewing all articles
Browse latest Browse all 396

Trending Articles