
या देहाला वासना, इच्छा, लवकर सोडत नाही. अंतिम क्षणापर्यंत मनुष्याचे मन इच्छा,वासना या कशात तरी अडकलेल्या असतात. आणि त्या पूर्ण न होताच देह संपला तर पुन्हा जन्म आहेच जर पुन्हा जन्म झाला नाही तर अशा लोकांना पिशाच्चं योनी प्राप्त होते. ती कारण देह मुळे त्यासाठी मृत देहावर अंतिम संस्कार व्यवस्थित करून घ्यावा लागतो. त्यामुळे देहाची नीट व्यवस्था लागेल. ज्या पंच महा भूतांपासून हा स्थूल देह निर्माण होतो. त्यावर अग्नी संस्कार करून जे ते तत्व ज्या त्या तत्वात विलीन केले जाते. मातेच्या गर्भात संस्कारांना सुरवात होते ती अंत पर्यंत चालूच असते. अंत्य संस्कार हा सोळावा संस्कार आहे.
सूक्ष्म देह हा कधीच नष्ट होत नाही. याला आत्मा म्हणतात. आत्मा हा अमर आहे. यावर कशाचाही परिणाम होत नाही. हा अमर आत्मा वासना व इच्छा यांच्या मुळे अस्तित्वात असलेल्या कारण देहात प्रवेश करीत राहतो. व म्हणूनच मानव पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात सापडतो. जन्माला आलेला जीव नवा वाटत असला तरी तरी त्या स्थूल देहाने जुने आवरण सोडून नवीन आवरण धारण केलेले असते. म्हणून तो नवा वाटतो. जे जे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसते ते ते सत्यच असते असे नाही. ते सत्य असल्याचा भास मनाला होतो एवढेच. प्रत्यक्ष अवस्था हि भगवन्त जाणतात.
The post देह आणि मन २ appeared first on Marathi Unlimited.