Quantcast
Channel: मराठी लेख वाचकांसाठी : Marathi Articles Sangrah | lekh, education, love, social, life, health, astrology, kids, youngsters, media., mother
Viewing all 396 articles
Browse latest View live

अध्यात्म

$
0
0
Spirituality is a broad concept with room for many perspectives. In general, it includes a sense of connection to something bigger than ourselves, and it typically involves a search for meaning in life. As such, it is a universal human experience—something that touches us all. People may describe a spiritual experience as sacred or transcendent or simply a deep sense of aliveness and interconnectedness.
For more information read following article.

science-and-spirituality-705x350

भक्तिभाव
ईशवराचे भजन, पूजन, कीर्तन , प्रार्थना,नामसमरण, उपवास, व्रत, होमहवन, जपतप इत्यादी गोष्टी करण्यास साधारणपणे भक्ती असे म्हंटले जाते , आणि हि भक्ती ज्या भावनेतून केली जाते त्याला भक्तिभाव असे म्हणतात. भक्तिभाव हि एक विशिष्ट मानसिक भावना आहे. ती भावना मनात निर्माण करण्याकरिता ज्या क्रिया करण्यात येतात तिला भक्ती असे म्हणतात. प्रत्येक धर्मानुसार भक्तीचे स्वरूप निरनिराळे दिसून येते. परंतु भक्तिभाव हा मनुष्याच्या धर्मावर अवलनबुन नसून मुख्यत्वे त्याच्या ज्ञानावर अवलनबुन असतो. मनुष्य भक्ती करतो कि नाही यापेक्षा त्याच्या मनात भक्तिभाव आहे कि नाही हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे. कारण आज बाह्यतः अनेक व्यक्ती भक्ती करताना दिसतात. परंतु त्यांच्या मनात भक्तिभाव असतोच असे नाही. आताशा; भक्तिभाव पेक्षा भक्तीलाच जास्त महत्व दिलेले दिसतेय. निरनिराळे धर्म व धार्मिक पंथ यांच्या अनुयायांची वाद, भांडणे, मारामार्या, लढाया या त्यांच्या मुळाशी हे आचार विषयक मतभेद असतात. भक्ती आणि भक्तिभाव यांच्या मधील यातील फरक लक्षात आल्यास हे कलह कमी होऊ शकतात.परमार्थ किंवा व्यवहार यात भक्तिभावाला खरे महत्व असून भक्तिभावाशिवाय नुसत्या भगवतीच्या बाह्य आचरणाला विशेष किंमत नसते सर्व विश्वाच्या कारभाराचे नियंत्रण करणारी कोणीतरी एक सर्व सामर्थ्य संपन्न शक्ती विश्वाच्या मुळाशी आहे. जागतिक सर्व स्थावर जगम पदार्थ म्हणजे त्या शक्तीने आपल्या अतर्क्य लीलेने धारण केलेली निरनिराळी रूपे आहेत. तिच्या प्रेरणेने विश्वातील सर्व कारभार चाललेला आहे. एक झाडाचे पण सुद्धा त्या अतर्क्य शक्तीच्या इच्छे विरुद्ध हळू शकत नाही. हीच जांबिव मनुष्याच्या बुद्धीला झाली म्हणजे त्याच्या मनात जी भावना निर्माण होत असते त्याला भक्तिभाव असे म्हणता येईल. अतर्क्य शक्तीला ईशवर म्हणतो व भक्तिभावाला ईशवर निष्ठा म्हणतात. भक्तिभावाने सुपरिणाम व्यवहारात अनेक प्रकारे दिसतात. भक्तिभाव हि दैवी भावना आहे. हि असामान्य आहे. ज्यांच्या मनात ती असते त्यांच्या मनात आसुरी भावनांना प्रवेश मिळू शकत नाही. मनात उत्कृष्ठ भक्तिभाव असला म्हणजे अनिष्ठ भावनांना तेथे ठार मिळत नाही. हा अनुभव व्यवहारात येतो. अहंकार, भीती, दुःख, क्रोध द्वेष, लोभ, सूद इ. अनिष्ठ भावना भक्तिभाव युक्त मनुष्यात कधीच दिसत नाही. त्यांच्या मनाची शांती कधीच नष्ट होत नाही. मनुष्याची स्थिती आयुष्यभर एक सारखी राहू शकत नाही, प्रत्येकाची स्थिती कालामाना नुसार बदलतेकधी भरभराटीचे दिवस असतात तर कधी अपयशाचे , कधी संकटे हात धुऊन पाठीमागे लागतात. या दोन्ही परिस्थितीत सामान्य मनुष्याची मनोवृत्ती निरनिराळ्या प्रकारची असते, भरभराटीच्या काळी सामान्य मनुष्याचा अहंकार प्रगट होतो. त्यामुळे भरभराटी नंतर पुन्हा अधोगतीला गेलेली उदाहरणे कितीतरी आहेत.ज्यांच्या मनात खरा भक्तिभाव जागृत असतो ते सर्व,कर्ता करविता परमेशवर आहे या गोष्टीची जाणीव सदोदित मनात बाळगतात. सुखात-दुःखात ते परमेशवराला धन्यवाद देतात. त्यांच्या अंगी विनयशीलता, नम्रता,सौजन्य, भूतदया, सहानुभूती दिसत असते.
कर्म करणे आपल्या हाती आहे त्याचे इष्ट्फळ मिळणे किंवा न मिळणे हे परमेश्व्राच्या आधिन आहे. अशी भावना मनात जागृत असली म्हणजे दुर्गुण किंवा अनिष्ठ भावना हे डोके वर काढीत नाही. यांच्या कुठल्याही कार्यात इतरां कडून कधीही अडथळे होत नाही. त्यांची भरभराट होत असते. भरभराटीच्या काळी मनाला भडकू न देणारे व आपत्तीच्याकाळी मनाला अभय करून शांती व धैर्य देऊन त्यांचा उत्साह वाढविणारे भक्तिभावासारखे दुसरे औषध नाही असे म्हणणे योग्य होय.भक्तिभाव मनुष्य आपत्तीने दबून जात नाही. किंवा संकटाना डगमगत नाही. ज्या अनिष्ट घटना घडत आहे त्याच्या मागे परमेशवराचा काही शुभ हेतू असावा हा उद्देश ठेवून त्याचा शांततेने स्वीकार करतात. त्यांची मने सदैव स्थिर असतात त्यामुळे संकटांची तीव्रता त्यांना भासत नाही. त्यातून सुखरूपपणे बाहेर पडतात. परमेशवर आपल्याला मदत करतो अशी निश्चित भावनाच त्यांच्या मनी वसंत असते. भक्तिभाव युक्त मनुष्य हा जगातील सर्व मनुष्यप्राणी यांना ईशवर रूपे मानूनच व्यवहारात वागतो. सर्व कर्मे करताना आपण ईशवराचीच सेवा करीत आहोत अशी भावना असते.
व्यवहारातील प्रत्येक काम उत्तम प्रकारे करावे म्हणजे ती सहज व समाधान कारक होतात. त्याच्याच अंगचे कौशल्य दिवसेंदिवस वाढत जाते. त्यांच्या विषयी लोकांच्या मनात आदर व आपुलकी वाढते, व्यवहारात तो जास्त यशस्वी व सुखी होतो. ऐहिक जीवनात त्याचा दिवसेंदिवस उत्कर्ष होत जातो. आणि परमार्थिक दृष्ट्या त्याचे कल्याण होते. ईशवरार्पण भावनेने आपले कर्तव्य करीत राहणे हाच खरा भक्तिभाव होय. त्याच व्यक्तीला ईशवर सदा सहाय्य करितो.

मनुष्य कितीही दुराचारी असला तरी त्याच्या मनात खरा भक्तिभाव जागृत झाला तर तो साधू किंवा धर्मात्मा होतो. त्याच्या हातून दुराचरण होऊ शकत नाही. त्याची सर्व दुःख नाहीशी होतात. सर्व भावाने ईशवराला शरण गेल्याने परमशांती मिळते त्याची ईशवरावर अनन्य निष्ठा असते, त्याच्या प्रत्येक भावना शुद्ध होऊन तो ब्रम्हरूप होण्यास समर्थ असतो अखेर त्याला शाश्व्त सुख प्राप्त होते.

The post अध्यात्म appeared first on Marathi Unlimited.

आरोग्य

$
0
0
Good health is actively and purposefully behaving in ways that leave you stronger, better nourished, less stressed, and more comfortable in your body and mind. Good health is more than not being sick. When you are healthy, you enjoy many benefits. Good health is possessing the energy and motivation to seek the things you most want without the distractions or stresses of illness. Good health is being hardy and sound in body and mind. If you are in good health you are able to enjoy all the good things in life without guilt or shame because you are satisfied and confident in your ability to moderate your behaviors. Good health is being free of addictions and compulsions.
For more information read following article.
aia-vitality-your-guide-to-better-health-1

कधी कधी भाजी खाण्यास नको वाटते, तेव्हा चटणी चा स्वाद हवा हवासा वाटतो, चटणी, आरोग्यासही छान असते.
आवळ्याची चटणी- खाल्याने इम्यून सिस्टम चांगली असते, यात असलेल्या व्हिटॉमिन सी आणि अन्य पोषक घटकांमुळे शरीराच्या अनेक समस्यां दूर होतात. आवळ्याच्या चटणीत आले व लिंबू मिसळून खाल्याने हृदय रोगाच्या समस्यां दूर होतात.
टोमॉटोची चटणी – व्हिटामिन सी ,लाइकोपिन, पोट्याशियम अधिक प्रमाणात असल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म यात असतात. वजन कमी कणाऱ्यांसाठी हि चटणी लाभदायक आहे.
कांदा व लसणाची चटणी- लसणात अँटिबायोटिक अँटी फँगल आणि अँटी बॉक्टेरियल
गुणधर्म असतात. हे वयानुसार शरीरात होणारे बदल कमी करण्यास व आरोग्यास मदत करण्यास फायदेशीर आहे.
कढीपत्ता चटणी – या चटणीत लोह व फॉलिक ऍसिड अधिक प्रमाणात असते.तसेच यात कॅल्शियम व इतर व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे केस काळे व जाड आणि मजबूत होतात. शरीरातील रक्ताची कमी भरून काढण्यास त्याच बरोबर उंचच रक्तदाब व मधुमेह सारख्या समस्यां यां वर फायदेशीर आहे.
कोथिंबीरची चटणी — यात व्हिटॅमिन सी आणि प्रोटीन अधिक प्रमाणात असल्याने मधुमेह सारखे आजार दूर करण्यास मदत होते. तसेच पुदिन्याच्या चटणी मध्ये अँटी ब्यक्टेरिअल गुणधर्म असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. कोथिंबीर आलं आणि लसूणाची चटणी आतड्यांचे विकार ताप डायरिया यां सारख्या आजारावर फायदेशीर आहे.

The post आरोग्य appeared first on Marathi Unlimited.

एक विचार

$
0
0

A thought or collection of thoughts that generate in the mind. An idea is usually generated with intent, but can also be created unintentionally. Ideas often form during brainstorming sessions or through discussions.

For more information read following article.

 idea

आपल्या धनाचे,पैशाचे मालक बना रखवालदार नाही. जो आपला पैसे खर्च करू शकतो, किंवा कुणास मदत करू इच्छितो तोच मालक असतो, नाहीतर मालक असून तो रखवालदारच कार्य करतो म्हणजे तो होय.

तुम्हाला श्रीमंत बनायचे असेल तर तुम्ही धनिकांचा तिरस्कार करू नका. तिरस्कार करीत असाल तर तुम्ही श्रीमंत होऊ शकणार नाही.

The post एक विचार appeared first on Marathi Unlimited.

किचन मधील नॉनस्टिक भांडी, आरोग्यास कितपत योग्य व सोईस्कर

$
0
0

Our health and well-being are greatly influenced by the quality of the food we eat, cooking techniques and the tools we are using to make our dishes. We often hear about Importance of eating organically grown food, free of pesticides and other harmful chemicals. The nutritional value of food can be easily ruined if we use cookware that leaches harmful chemicals and heavy metals into it. Safe cookware is a vital part of healthy cooking and is highly important in keeping you and your family healthy.

For more information read following article.

 0756daca-5b0e-46eb-9145-931fd1371f84_1.5eef0dd96de9193c852d5033eca45474

आजच्या स्त्रियांत नॉनस्टिक भांडी वापरण्याकडे जास्त कल आहे. चवीमध्ये कोणतीही तडजोड न करता नॉनस्टिक दर्जा आणि पीएफओएमुक्त कोटिंगमुळे स्वयंपाक बनविणे सोपे होते. नॉनस्टिक कुक्वेअर वापण्यासाठी आणखी काही करणे आहेत.
कमीत कमी तेलाचा वापर करून स्वयंपाक
तसे आपले भारतीय स्वयंपाक कमी तेलात बनविणे म्हणजे स्वप्नवत गोष्ट परंतु हे नॉनस्टिक कोटिंगमुळे शक्य आहे, कारण या कोटिंगमुळे शिजणारे अन्न तळाला चिकटत नाही. आणि कोणतीही काळजी नकरता पदार्थ कमी वेळात शिजतो, शिवाय तेल कमी वापरताना चवीत कोणतीही तडजोड करावी लागत नाही.
स्वच्छतेला सोपे
नॉनस्टिक भांडी स्वच्छ करण्यास फार सोपे असून त्यावर ओरखडे उठत नाहीत. स्वच्छ करताना जास्त प्रेशर द्यावे लागत नाही. तेलाशिवाय स्वयंपाक करताना मदत करणारे पॅन्स आणि पॉट्स हे अजिबात तेलकट होत नाही. यात अन्न शिजताना उष्णेतेचे समान विभाजन झाल्यामुळे अन्न समान पद्धतीने शिजते. तेला शिवाय, व पटकन शिजते. चव समृद्ध होते व नैसर्गिक स्वाद टिकून असतो.
स्वयंपाक घरातील स्टायलिश लूक
नॉनस्टिक सेट्स आधुनिक व स्टायलिश लूकमुळे स्वयंपाक घर स्टायलिश दिसते. अभिनव कोटिंग आणि खास तंत्रज्ञानमुळे नॉनस्टिक कुकवेअर कायम चमकदार व ओरखडामुक्त दिसतात. स्वयंपाक घरातील इतर भांड्यांच्या तुलनेत नॉनस्टिक कुकवेअर स्वयंपाक घराला तसेच आधुनिक घराच्या इंटेरियरला स्टाइल देतात. हि नॉनस्टिक भांडी तयार करताना एका विशिष्ट्य केमिकलचा वापर केला जातो तो म्हणजे परफ्लोरो ऍसिड ( पि एफ ओ एफ ) हे शरीराला घातक असे केमिकल आहे वास्तवात नॉनस्टिक भांड्यामधील हि केमिकल्स स्थिर अवस्थेमध्ये शरीराला तशी घातक नाहीत. परंतु जेव्हा आपण या नॉनस्टिक भांड्यांना अन्न शिजविण्यासाठी म्हणून अति उष्णता देता व जेव्हा टार्या भांड्याचे तापमान साधारण २६० अंश सेल्सिअस एवढ्या उष्णते पर्यंत पोचते तेव्हा त्यामधील केमिकलचे विघटन सुरु होते व ते भांडे विषारी वायू फेकू लागते दुर्दैवाने हे विषारी घटक धोकादायक ठरतात तेव्हा जास्त वेळ व जास्त उष्णता लागणारे पदार्थ यात शिजवू नये. म्हणून हेवी पदार्थ यात शिजवू नये एवढी खबरदारी घ्यावी, नाहीतर आजारांना निमंत्रण देण्या सारखे होईल.

The post किचन मधील नॉनस्टिक भांडी, आरोग्यास कितपत योग्य व सोईस्कर appeared first on Marathi Unlimited.

जीवनात पैशा बाबत योग्य तेच विचार असू द्या.

$
0
0

Money can become an addiction like anything else. It can control your life. And to be honest, it’s probably the only thing in our life that at times has become an obsession.There are plenty of reasons to save for a rainy day, especially if your income is low or average. If you don’t have a stable job but are paid commissions or bonuses or have a seasonal job, this is yet another reason to save to be financially independent. The unfortunate truth is that bad thing and emergencies can happen to everyone.
For more information read following article.

 SIP-Money-_Birla-Growmymoney-770x433

पैशाबाबत आसक्तीची भावना हि एक समस्यां होय. जीवनात पैसा भरपूर असावा हि भावना खरी परंतु त्याच बरोबर तो सत्य प्राप्त करण्यास सहाय्य भूत असावा हे महत्वाचे ठरते. आपण जर त्याला ध्येय मानले तर तो आपल्याला कधीच सहाय्य करू शकत नाही. त्याबद्दल आसक्ती निर्माण होते त्याच सोबत आपणातले योग्य, नवे,आणि सृजनात्मक विचार विसरायला लागतात. परंतु याच विचार सरणीची अत्यन्त गरज असते. हि विचार सरणी आपल्याला विसरून चालणार नाही. आपण जेवढा पैसा कमवितो त्या क्षमतेवर आपला विश्वास असला पाहिजे. योग्य मार्गाने पैसा कमविणारे लोक निश्चिन्त असतात. त्यांना पैशाची चणचण भासते तेव्हा नव्या कल्पना शोधण्याची स्वतःची क्षमता त्यांना माहित असते. कारण त्यांना समस्यां पैशाची नसून नव्या कल्पनेची आहे त्यावर त्यांचा विश्वास असतो. विचारांचे प्रशिक्षण आपली योग्यता वाढविते. (योग्यता वाढणे म्हणजे कोणतेही कला कौशल्य शिकणे, कम्प्युटर शिकणे, नवी भाषा शिकणे ,अशी किती तरी नावीन्य कला,व्यवहार शिकण्यासारखे असतात, कधी तरी कुठल्याही कार्य क्षेत्रात सेवा देता येतात. ) हे निर्णय घेण्याची क्षमता आपल्यात निर्माण करायला हवी.

नशीब अजमावण्या साठी सट्टा,जुगार,रेस ,लॉटरी हे तर फसवेगिरी व वेळ वाया घालविणे हाच प्रकार होय. आणि शेवटी पश्चातापाशिवाय हाती काहीही लागणार नाही.

पैसा हे वरदान आहे त्याला अभिशाप बनवून चालणार नाही. पैसा असलातरी त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. खर्चाचे अंदाजपत्रक असेल तर युक्तीचा आनंद मिळून ईशवराच्या रचनेचा हि आनंद मिळू शकतो. पैसा आपल्या जवळ येतो ती ईशवराची रचना होय. जशी सृष्टीची सर्वकार्य ठरल्याप्रमाणे चालतात. त्यामुळे आपली कार्य देवाण-घेवाण सहज -सुलभ होते हि एक विस्म्यजनक व्यवस्था आहे. हि सुलभ होण्यासाठी ईशवराने पैशाची निर्मिती केलेली आहे. हे भान असायला हवे तेव्हाच पैसा वरदान ठरेल. भान विसरलात तर तोच अभिशाप ठरतो.
पैसा जास्त आल्यास अहंकार येतो, त्याची शिक्षा कधी तरी मिळतेच.

The post जीवनात पैशा बाबत योग्य तेच विचार असू द्या. appeared first on Marathi Unlimited.

जीवनातील अत्यावश्यक विचार…पैसा

$
0
0

Money doesn’t make you happy, says everyone, reassuringly, about not having enough money. Money does make you happy after all, says a new paper published by the UK government. “An individual’s level of personal well-being is strongly related to the level of wealth of the household in which they live,” says the report, which was designed to measure the relationship between wealth and happiness in the U.K. population
For more information read following article.

 shutterstock_128750492-e1428891080738

The post जीवनातील अत्यावश्यक विचार… पैसा appeared first on Marathi Unlimited.

पैशाबाबत आपला दृष्टिकोन

$
0
0

Money doesn’t make you happy, says everyone, reassuringly, about not having enough money. Money does make you happy after all, says a new paper published by the UK government. “An individual’s level of personal well-being is strongly related to the level of wealth of the household in which they live,” says the report, which was designed to measure the relationship between wealth and happiness in the U.K. population
For more information read following article.

 indian_rupee

पैशाबाबत आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा, पैसा खर्च किती झाला हेच पहात बसण्या पेक्षा त्या मोबदल्यात आपल्याला परतून काय प्राप्त झाले हे बघणे महत्वाचे. दृष्टिकोन योग्य असेल तर त्याच्या दुपट्टीने परत मिळते हे आपल्या लक्षातच येत नाही. म्हणून आपले नकारात्मक विचार प्रथम थांबवायला हवे. आपण नेहमी अर्ध सत्य बघतो, आपली पूर्ण सत्याची लपवालपवी चालू असते. बाहेर गेल्याने ५०० रुपयाचे पट्रोल लागले हे तर लक्षात राहते व एकवेळ आवश्यक खर्च काय झाला हे सुद्धा लक्षात राहते परंतु अनावश्यक असा वायफळ खर्च केला हे विसरून जात असतो तीच हि लपवालपवी होय. म्हणून खर्चा वर नियंत्रण असणे गरजेचे आहे. तेव्हाच पैसा खर्च होऊन आपले महत्वाचे कार्य किती झाले हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. पूर्ण सत्य स्वतःच्या मनाला सांगा, गाडीतुन गेल्यास वेळ वाचला, उन्हाचा त्रास वाचला, कष्ट वाचले, वेळेत पोचल्याने कार्य पूर्ण झाले, आनंद प्राप्त झाला हे सर्व सत्य आपल्या अंतर मनाला पोचवावे. त्याच प्रमाणे आपल्यात तशीच प्रचिती येते. हे विचार म्हणजे पैशांशी निगडित भावना कारण समस्यां हि फक्त पैशांशी जुळलेली नसून ती आपल्या भावनांशी व विचारांशी जुळलेली असते. फक्त पैसा गेला हीच भावना असणे म्हणजे क्षय, हानी हि मनाची विकृती होय. आपल्या जवळ पैसा असूनही त्याची कमतरता वाटते. हे योग्य नव्हे. म्हणूनच पैसा गेल्याने त्यासंबंधी बोलताना अर्ध सत्य बोलू नये त्यातून काय मिळाले हे विचार अवश्य करा. असं केल्याने जीवनात भरपूर पैसा तुमच्या जवळ येत राहील. चुकून कुणाला पैसा दिला असेल तरी त्याचे दुःख उगाळत बसू नका, तो केव्हा तरी कधी तरी दुपट्टीने परत येणारच हेच अंतर्मनाला सांगा म्हणजे तो प्राप्त होतोच आपल्या लक्षात येत नसेल तरी हेच सत्य होय.

तुम्ही ज्या गोष्टींकडे लक्ष पूर्वाल ती वृद्धिगत होईल, सावरेल आणि मजबूत होईल. हा नियम आपले आर्थिक आरोग्य मिळविण्याचे एक रहस्य होय.

The post पैशाबाबत आपला दृष्टिकोन appeared first on Marathi Unlimited.

Humanity religion and ‘Ramakrishna Mission’

$
0
0

Humanity religion and ‘Ramakrishna Mission’:  Beginning from an analysis of human rights activity in terms of a relationship between a judgement on human nature and consequent action, the article explores the claim that the teachings of Sri Ramakrishna and Swami Vivekananda provide an authentically Hindu basis for a commitment to human rights activity. Reference is made to the contemporary work of the Ramakrishna Movement and to the justifications it gives for its activities.  Read complete article on Ramakrishna Mission.

Sri-Ramakrishna-Dec-2017

मानवता धर्म आणि ‘रामकृष्ण मिशन’:

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बंगाल प्रांतात स्थापन झालेली  अध्यात्मिक क्षेत्रातील सेवाभावी संस्था म्हणजे ‘रामकृष्ण मिशन ‘  स्वामी विवेकानंद यांनी या संस्थेची उभारणी केली  रामकृष्ण परमहंस हे आयुष्याच्या अखेरीस  कर्क रोगाने आजारी असताना त्यावेळी त्यांचा नरेंद्र म्हणजेच स्वामी विवेकानंद आणि अजूनकाही शिष्य यांना संवादातून मार्गदर्शन करीत असत. रामकृष्ण मिशन या स्थापनेचे बीज याच संवादातून आहे.  पुढे काही दिवसांतच रामकृष्णांनी त्यांच्या  अंतरंग शिष्यांपैकी  नरेंद्र राखाल  आदीं अकरा जणांना भगवी वस्त्रे  व रुद्राक्षांच्या माळा दिल्या  आणि एक छोटासा विधी करून त्यांना दीक्षा दिली, आणि एके दिवशी भिक्षा मागून आणण्यास सांगितले  रामकृष्णांनी तो दिलेला संन्यास म्हणजे ‘रामकृष्ण मिशनचा’ आरंभ होय. अशी त्यांच्या शिष्यांची धारणा आहे. रामकृष्ण हे अखेरीस निरवानिरव करताना  नरेंद्रास म्हणाले ‘ माझ्या मागे सर्व मुलांची नीट काळजी घे त्यांतील कोणीही संसारच्या पाशात अडकणार नाही तेवढे पहा. ‘ त्यांनी त्यांची पत्नी शारदादेवी यांनाही ‘ तुम्हाला यासाठी पुढे काही कार्य करावे लागेल ‘ असे सांगितले. शारदा मातेने वात्सल्यपूर्ण मार्गदर्शन त्या अंतरंग शिष्याना १९२० प्रयन मिळत राहिले.

रामकृष्णांनी महासमाधी १५ ऑगष्ट १८८६  रोजी घेतल्या नंतर त्यांचे सारे अंतरंग शिष्य कोलकात्याच्या  वराह नगर भागातील एका पडक्या घरात  राहत असत. त्यावेळचा तोच पहिला ‘रामकृष्णमठ’  रामकृष्णांचे काही  गृहस्थाश्रमी शिष्य  त्यासाठी आर्थिक सहाय्य करीत  शिष्यांचा जीवनक्रम अध्यात्मिक साधना, धर्म ग्रँथांचा अभ्यास आणि धूमधून तीर्थ यात्रा असा होता.  त्यांनी विधी पूर्वक संन्यास दीक्षा १८८७ साली ‘विरजा’ होम करून घेतली व नवी नावे धारण केली. नरेंदरची स्वामी विवेकानंद, इतर सर्व स्वामी ब्रम्हानंद, शारदांड, प्रेमानंद,  शिवानंद, अभेदानंद, तुरियानंद, रामकृष्णानंद, त्रिगुणातीतानंद , योगानंद, नीरजानंद,  अद्वैतानंद आणि अद्दभूतानंद या प्रमाणे झाली या सर्वांच्या शकार्यातूनच ‘ रामकृष्ण मिशन’ पंथ व संघटना आकारास आली.

मात्र ते प्रत्यक्षात उतरण्यापूर्वी  विवेकानंदांनी भारत भ्रमण केले होते,  शिकागो येथील सर्व धर्म परिषद मध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करून  अपूर्व यश प्राप्त केलेले होते.  त्यांनी लंडन – अमेरिका  येथे साडे तीन वर्षे संचार  करून ‘वेदांत सोसायटीची’ स्थापना केली.   विवेकांनदांनी त्यांचे गुरुबंधू व रामकृष्णांचा प्रमुख अनुयायी यांची खास सभा १ मी १८९७ या दीवशी कोलकात्याला बाग बाझार भागात बलराम बसू  यांच्या घरी घेतली, व ‘रामकृष्ण मिशन ‘ ची रीतसर स्थापना केली. त्यांच्या संस्थेचे परिचित नाव ‘रामकृष्ण मिशन’ असले तरी मूळ नाव रामकृष्ण संघ ‘ यांचे दोन स्वतंत्र भाग ‘ रामकृष्ण मठ’ आणि ‘रामकृष्ण मिशन’  असे सोयी नुसार करण्यात आले.  मठाच्या शंखातून धार्मिक कार्य,  तर मिशन च्या शाखाद्वारे शिक्षण, दवाखाने, आपत्कालीन सहाय्य – सेवाकार्य  याप्रमाणे विभागणी करण्यात आली. ‘रामकृष्ण संघ’ हा रामकृष्णांच्या जीवनात आविष्कृत झालेल्या अध्यात्मिक  सत्यांचा आचार व प्रचार करणे, पाश्चात्य जगात वेदांत धर्माचा संदेश पोचविणे  भारतात आधुनिक विद्देचा प्रसार करण्यासठी  शिक्षण संस्था चालविणे  अशी ध्येय समोर ठेवून  स्थापन्न केले गेले. ‘रामकृष्ण संघ’ १८९९ मध्ये बेलूरला  स्वतःच्या मालकीच्या जागेत साकारला गेला  त्याचे केंद्रीय कार्यालय बेलूर येथे आहे.  संन्याशी व ब्रम्हचारी मिळून हजारोच्या संख्येत कार्यकर्ते तेथे कार्यरत आहेत.  नवागत ब्रम्हचर्यासाठीं  बेलूर मठात शिक्षण केंद्र असून  तेथे दोन वर्षाचा पदवव्युत्तर   पातळीचा अभ्यासक्रम आहे.

स्वामी विवेकांनदांनी संघासाठी बोधचिन्हे बनविली आहेत.  त्या बोध चिन्हात लाटा हे कर्माचे प्रतीक, कमळ हे भक्तीचे प्रतीक, उगवता सूर्य हे ज्ञान चे प्रतीक आणि चत्रा भोती असलेले सापाचे वेटोळे हे  योगाचे व जागृत कुंडलिनी शक्तीचे प्रतीक, हंस हे परमात्म्याचे प्रतीक याप्रमाणे आहेत. हे बोध चिन्ह असे सुचविते कि  कर्म, ज्ञान, भक्ती व योग्य  यांच्या समानव्यि साधनेतून परमात्म्याचे दर्शन घडते.

‘रामकृष्ण मठ’  श्री रामकृष्ण यांच्या  दिव्य जीवनातून प्रेरणा घेऊन  पावित्र्य , आणि वैराग्य  यांनी युक्त असे अध्यात्मिक जीवन व्यतीत करणाऱ्या साधूंचा संघ  अस्तित्वात आणणे आणि  त्या

संन्याशी साधूं पैकी काहींना शिक्षकाच्या  किंवा कार्यकर्त्याच्या भूमिकेने  सिद्ध करून जगाच्या कोणत्याही भागात  सेवकऱ्यास पाठविणे हि ‘ रामकृष्ण मठा’ च्या कार्याची दिशा आहे. तर रामकृष्ण मिशन सर्व साधारण  कार्यकर्त्यांचा सहकार साधुन त्यांच्या करवी जाती, धर्म, पंथ  आणि देश यांचा भेद न मानता  सर्व मानवांना ईशवराची रूपे मानून  त्यांच्या सेवेची कामे करणे हि

‘रामकृष्ण मिशन’ च्या कार्याची दिशा आहे. मठांच्या सर्व शंखामधूनरामकृष्णांची पूजा आरती होते. तर रामकृष्ण, शारदामाता आणि विवेकानंद याचे जन्म  दिवस साजरे होतात. जातीभेद, धर्मभेद,  उच्चं – निच भाव तेथे मानले जात नाही.  स्वामी विवेकानंद १९०२ मध्ये समाधीस्थ झाले.  त्यानंतर मठाचा कार्यभार ब्रम्हानंद, शिवानंद, अखण्डानंद  आदी गुरु बंधूंनी १९३९ पर्यंत सांभाळला.

मठ व मिशन यांच्या भारतात सर्व भागात मिळून जवळ जवळ ९० शाखा आणि फ्रान्स, इंग्लड , अमेरिका, अर्जेंटिना, स्वित्झर्लन्ड ,सिंगापूर, मॉरिशस, फिजी बेटे, श्रीलंका, बांगला देश आणि इतर देशातही तीसच्या वरून शाखा आहेत.  भारतात मिशन तर्फे सर्व सर्वसामान्य  नागरिकांसाठी  सुसज्ज रुग्णालये बंदी गेली आहेत  सुमारे शंभर वस्ती गृहातून  हजारो विद्यार्थी- विध्यार्थिनी ची सोय केली जाते. रोगराई, दुष्काळ, भूकंम्प, महागाई, अशा आपत्कालीन  संकट प्रसंगी कार्यकर्त्यांची गर्दी  मदतीला धावून जाते. ‘रामकृष्ण मिशन’ हे आदर्श सेवाभावी  केंद्र असून तेथे ‘ मानवता’ या धर्माचे पालन केले जाते  आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो. आणि एक म्हणजे नीती मूल्यांचे जतन केले जाते.

म्हणून ‘मानवता’ हाच खरा व एकच धर्म याचा स्वीकार व्हावा….

The post Humanity religion and ‘Ramakrishna Mission’ appeared first on Marathi Unlimited.

Thinkers of Humanity and Saints

$
0
0

Thinkers of Humanity and Saints : According to the theory of the law of attraction, our thoughts are magnetic and have their own frequency and consequently when we think we emanate a frequency depending on the kind of thinking we have and for the fact that our thoughts are magnetic, we attract everything located on the same frequency. Read complete Marathi article for Humanity and Saints.

books-power-change-thoughts-life

मानवता वादी विचार आणि संत:

आपल्या महाराष्ट्र राज्याच्या  सांस्कृतिक परंपरेचा सरवोचच सम्मान म्हणजे इथली अनेक शतकांची संत परंपरा असेच त्याचे वर्णन करावे लागेल. महाराष्ट्रात गेल्या सातशे वर्षापासूनच काळ हा आपण संतांचा आणि संत वाङमयाचा काळ म्हणूनच ओळखतो. य्७या वाड्मयात सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब किती उमटलेले असते त्यावर वाङमयाचे आयुष्य व त्याचे स्वरूप अवलंबुन असते.  म्हणजे समाजकता हे जीवन व जातिवन्त साहित्याचे प्रमुख लक्षण असते. त्या काळापासून ते आजही तितकेच वाचनीय व भक्तीत लोकप्रिय आहे.आजही अशिक्षित पासून ते शिक्षितांपर्यंत सर्वांच्याच ओठाओठांवर आहे. महाराष्ट्रा नंतर अन्य कोठेही इतकीसी असेल असे वाटत नाही. संत आणि जागतिक वाङमयाचा जीवंतपणा  ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. संतांनी समाजातील विकृती नाहीशा करून समाजाला नैतिक मार्गावर आणण्याचे महत्वाचे कार्य केलेले आहे.

भारतीय समाजाच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक  विचारांना नवा आशय प्राप्त करून देऊन सम्पूर्ण समाज जीवनाला एका नव्या वाटेवर आणण्याचे युग प्रवर्तक कार्य संतांनी केलेले आहे. अश्या या वैशिष्ठ पूर्ण परंपरेचा यासाठीच अभिमान बाळगावा लागतो. भक्तीच्या माध्यमातून समाजातील भेदभाव दूर करण्याचा मोठा संदेश दिला गेला आहे. प्रामुख्याने पंढरपूरच्या पांढुरंगाच्या निमित्ताने दरवर्षी भरणाऱ्या आषाढी , कार्तिकी यात्रा आणि यासाठी महिनाभर आधी वारीचा पायी प्रवास करून समाजातील सगळे भेदभाव कसे अमंगल आहे हे सांगण्याचा पूर्ण प्रयत्न संतांनी केल्याचे स्पष्ट दिसून येते.

संत परंपरेने समाजाला भक्तीची, चिंतनाची,आत्मपरीक्षणाची शिकवण दिलेली आहे. संतांनी मानवतावादी विचार जनसमाजात चांगल्या रीतीने रुजविण्याचा सखोल प्रयत्न केलेला आहे. मनुष्याने एकमेकांना मदत करून चांगले नागरिक समाजात निर्माण व्हावे, जीवन कसे सत्कारणी लागेल याचे शिक्षण दिलेत.

संतांनी कोणतेही लौकिक शिक्षण न घेता म्हणजेच आजच्या सारख्या शाळा, कॉलेजेस, पुस्तकी पांडित्य असे काहीही त्याच्या जवळ नव्हते. घराघरातून आणि समाजातून घडविले जाणारे संस्कार हाच त्यांचा जीवन शिक्षणाचा सर्वात मोठा आधार होता. त्या काळात जीवन मूल्यांना अधिक महत्व होते. आणि हे मूल्य टिकविण्यासाठी शुद्ध अंतकरणाने केलेली भक्ती हि विलक्षण स्वरूपाचे समाधान देते.  म्हणून संतांनी देवाकडे  स्वतःसाठी तर काहीही मागितले नाही त्याउलट समाजाच्या सुखासाठी त्यांनी आपला देह झिजवून जीवन संपविलेले आपण लक्षात घेतले आहे. जर प्रत्येकाचे अंत करणं शुद्ध असले तरच हे घडू शकते तेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखविले आहे. आणि ते सर्वत्र समाजाला पटलेले आहे. म्हणूनच आज शेकडो वर्षांनंतरही लाखो भक्त कोणताही भेदभाव मनात न ठेवता पांढुरनगाच्या दर्शनाला संघ करून पायी टाळमृदूंग घेऊनही मोठ्या हर्षाने वारी करतात. संतांच्या काळात काही प्रमाणात हा उचनीचतेचा फार भाव होता त्यामुळे त्यांनी अतिशय कठोर शब्दात निर्भत्सना केलेली त्यांच्या अभांगातून आपल्याला वाचायला मिळते. परमेशवराला सर्व समसमान आहेत तर मनुष्यातला भेदभाव कसा शिल्लक राहील.

आपल्या समाजामध्ये आजही संतांनी शिकवलेला मानवतावादी विचार हा खर्या अर्थाने भक्ती, ज्ञान आणि कर्म  या माध्यमातून समाजाला एकत्रित बांधून ठेवण्यासाठीच आहे. प्रत्येकाने त्याला मिळालेले  आयुष्य हे सार्थकी लावण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आणि तो करताना तुम्ही कितीही लौकिक शिक्षण घेतलेले असेल तरी देखील आंतरिक समाधानासाठी, शांतीसाठी, परम आनंदासाठी जे या लौकिक शिक्षणातू प्राप्त होत नाही. असा हा आनंद भक्तीतून प्राप्त होत असतो. असा हा चिरंतन स्वरूपाचा वसा संतांनी आपल्याला दिलेला आहे.

प्रामुख्याने महाराष्ट्रातील संतांच्या मांदियाळीचा विचार करताना ज्ञानोबा,  तुकोबाराया,  नामदेव, संत चोखामेळा , नरहरी सोनार,  सावतामाळी,  जनाबाई,  मुक्ताबाई अशी कितीतरी नावे घ्यावी तरी कमीच आहेत.  त्यांनी केवळ  आपल्या ईशवर भक्तीतून आनंदाचे निधान देण्याचे प्रयत्न केले आहेत. परंतु हे सर्व वाटते तितके सोपे व सहज नव्हते यासाठी त्यांना कितीतरी त्रास घ्यावा लागला. आपणही इतक्या गांभीर्याने त्याकडे बघत नाही. परंतु आजची सामाजिक परिस्थिती पाहिल्यानंतर समाजाला जोडून ठेवण्याचे कार्य हे फक्त आणि फक्त भक्ती व अध्यात्म्याच्या अंगाने होऊ शकते. म्हणूनच अनंत उपकार करणारे संत आमुच्या महाराष्ट्रासाठी निश्चितच अभिमानास्पद बाब आहे .

The post Thinkers of Humanity and Saints appeared first on Marathi Unlimited.

Housewife thoughts: Cooking ‘home’ is world.

$
0
0

Our Body loves food. The kind of food the food consumes the same way our mind works, the food should be saintly, pure and homely. The sattvik thoughts are made only by a godly diet. this article is based on how should our diet should be and how we take the food for better thoughts.

Maunika-Gowardhan

गृहिणी विचार: स्वयंपाक ‘घर’ हे विश्व्..:

मनुष्य देह  हा अन्नपिंडमय आहे. ज्या प्रकारचे अन्न ग्रहण करता  त्याच प्रकारचे विचार व्यक्तीच्या मनात व्युप्त होतात म्हणून आहार हा सात्विक, शुद्ध व घरचाच असावा. आणि सात्विक विचार हे सात्विक आहारानेच होतात. असया सात्विकतेचे मुख्य स्थान  म्हणजे घराचे ‘स्वयंपाकघर’ होय. घराचा ‘आत्मा’ म्हणजे ‘स्वयंपाकघर’ गृहिणीचे हक्काचे स्थान. कधी कडू, कधी तिखट, कधी गोड. सर्व रसांचा आस्वाद जसे तिखट, आंबट, खारट, तुरट, गोड वेळ पडल्यास कडू या सर्वांचाच स्वाद आपल्या आहारात उत्पन्न करणारे पवित्र स्थान तिथे भोजनाचे स्वाद तयार होतात ते ‘स्वयंपाक घर.

जिथे बसून आपण भोजनाचा आस्वाद घेतोच पण  मनातील दिवसभर साचलेल्या भावनांना  व्यतीत केलेल्या दिनचर्येचे चर्चा करतो त्यातून काही चुका तर काही गुण यांचे स्वतःचेच परीक्षण करता येते. कारण तिथेच विश्वास प्रेम देणारी भावना व्यक्त होते. घराच्या अंगणावरून आपण जसे घराचे चित्र मनात तयार करू शकतो. तसेच घरात असणारे आपले ‘देवघर’ हि घराची व घरातील व्यक्तींची ओळख न कळत देते. आयुष्यात घडणार्या सर्व सुख दुःखाची रुजवात होते तेव्हा याच देवघरा समोर बसून मन पुन्हा नतमस्तक होते.  ‘हे विश्व् ची माझे घर | एसी मनी ज्याची स्थिर || ‘ हि संत ज्ञानेशवराची ओव्या किती अनुभवनीय, आनंददायी आहे. ज्याला सारे जग आपले घर वाटते, जो मी म्हणून उरत नाही सर्व चराचर होऊन जातो तो या ‘घर’ संकल्ल्पनेतूनच ‘मी’ स्वतः पुरता मर्यादित न राहता विश्वा एवढा विशाल होण्याचा विचार देते ते ‘घर’ जशी मिठाने भरलेली पोटी सागरात परत पडली तर ती पूर्ववत होऊन जाईल तसेच ‘घर’ स्वतः पुरते न राहता आले तर?  जे केवळ व्यक्ती व्यक्तींवर अवलंमबुन राहते. आपल्या प्रवासाच्या प्राप्त प्रतिकूल परिस्थितीत आपले सामर्थ्य टिकून राहते कौटुंबिक प्रेम मिळणे आपल्या अंगच्या

चांगल्या गुणांचे कौतुक होते ते या घरामुळेच कारण याच घरात माया म्हणजे प्रेम, माया म्हणजे आपुलकी, माया म्हणजे संपत्ती,  ममता,  जिव्हाळा,  आपुलकी असते.  आणि त्यामुळेच घराचे घरपण सांभाळता येते. घरातील वातावरण आनंदी होते. परस्परांचे परस्परांशी वागणे बोलणे. संवाद असावा, पैसा स्वकष्टार्जित असावा. दान, धर्म असावे, हे सर्व घरातच रुजत असते. संयम, त्याग, सदाचार, समाधान हे खरे कृतार्थ जीवन घडते हे घरामुळेच ‘घर’ म्हणजे खर्या अर्थाने भौतिक, शारीरिक,  मानसिक गरजा पुरविणारे हक्काचे ठिकाण. ‘घर’ हे सुखद ओलावा, मायेची उब, थकल्याचा विसावा, मायेची फुंकर घालून मनाची रुजवात करून दिलासा देणारे एक सोनेरी पिंपळपाचं जणू जटिल धागे दोर्यान्नी विणलेली नाती हि सपाट नितळ जगण्याला एक्स्न्घता आणते.  ते ‘घर’ नुसते घर नसून खरे ‘तीर्थस्थान’ होय.

The post Housewife thoughts: Cooking ‘home’ is world. appeared first on Marathi Unlimited.

प्रीती आणि मैत्री

$
0
0

What is the difference between friendship and love? This question has always been in the minds of people for centuries. Though a definite answer cannot be given for this question, one can come across some differences between the two. Love and friendship are so much related, that one cannot find any difference between the two. When love can be termed as a sacrifice, friendship can be termed as a trust. Love is a feeling that is uncontrollable, and a feeling which one has for another person. On the other hand, friendship is quite different from love in this aspect.
For more information kindly read following articles.

Signs-that-Suggest-If-She-Likes-You-More-Than-Just-a-Friend-feature-1-640x360

सारांश   आणि  उत्तर

आजच्या संसाराच्या विचित्र विविध व्यवहारात संकट आणि अडचणी सर्वांच्याच वाट्याला येतात, अशावेळी मित्राकडे घाव घावी असे नसते. परिस्थितीशी  झुंज करण्याची करण्याची वेळ आली कि मनुष्याने  आल्यापायावर उभे राहावे. आणि अंगातील जे अस्सल गुणांची जी हत्यारे असतील त्यांच्याशी लढावं, मित्रांच्या मध्यस्थीची अगर चांगुलपणाची हत्यार उसनी मागून घेण्यात काही अर्थ नाही. हेच योग्य आहे. शिवाय मनात असं येत कि एखाद्या मित्राचे सहाय्य मागितलं आणि त्यानं ते दिल नाही, काम तर होऊन जाईल पण गैरसमजुतीनं मित्र गमावून बसण्याचं भय. तेव्हा नकोच मित्राची परीक्षा पहाण. विषाची परीक्षा पाहू नये म्हणतात ते हेच.  तसेच प्रीतीची व मैत्रीची परीक्षा पाहू नये, सुंदर फुल हाती आले कि त्यात किती मध आहे ते पाहण्यासाठी त्याच्या पाकळ्या तोडाव्या लागतात. त्यासाठी त्यात मध आहे हि खात्री ठेवावीच व त्या फुलाचा आस्वाद घ्यावा.   ते सौदंर्य हाती आले त्याचा कि भाग्याचा अभिमान बाळगावा त्याच विच्छेदन करू नयेत.

प्रीती आणि मैत्री

ज्यावेळी आपल्यावर आपत्ती कोसळतात त्यावेळी आपण आपल्या अंगच्या गुणांच्या जोरावर त्याचा  सामना केला पाहिजे. सहाय्य घेऊन आपण आपले बरेच काही गमावून बसू नये. हेच योग्य आहे.

The post प्रीती आणि मैत्री appeared first on Marathi Unlimited.

केल्यानेच होत असते

$
0
0

We were taught “Just work hard at whatever job you get, and things will work out.” That’s false. Working hard at your job does not get you much. When you work hard at a job where the boss doesn’t value your efforts, all your hard work gets you is taken for granted.  this article is basicaly about the Hard work. If you work you will get it. so samarth ramdas swami said  “If you work Hard, You will get Anything”. 

For more information kindly read following article.

preview

फार  पूर्वीची ” केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ” हि समर्थ रामदासांची उक्ती आहे.  आपल्या संत मंडळींनी प्रयत्नाचे महत्व सांगितलेले आहे. कोणत्याही कार्याची सिद्धी प्रयत्नां शिवाय होत नाही. – प्रयत्न हा स्थळ कालातीत –  जीवन सुखी होण्यासाठी कार्यतर राहणे फार महत्वाचे आहे. प्रयत्नवादाचे महत्व विशद करताना स्वामी समर्थ रामदास म्हणतात – ‘प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही  गळे ‘  त्याच प्रमाणे  तुकाराम महाराज म्हणतात – असाध्य ते साध्य | करीता सायास| कारण अभ्यास |तुका म्हणे ||  सायास म्हणजे प्रयत्न होय. प्रयत्न केला तरच असाध्य गोष्टी देखील प्राप्त होतील. परमार्थ  साधन करणारे संत हे प्रयत्नांचे महत्व पुन्हा पुन्हा सांगतात. ते प्रयत्नालाच परमेश्व्रर  मानतात.

यश, कीर्ती, वैभव हे फल स्वरूप आहे. गँलिलीओ, न्यटन , जगदीशचंद्र बोस, आइनस्टाइन, सी. व्ही. रामन, अब्दुल कलाम यांसारख्या शास्त्रज्ञानी विज्ञानक्षेत्रात  मोलाचे संशोधन केले आहे. यांत यश त्यांना एकाच प्रयत्नात मिळालेले नाही, एक एक प्रयोग शेकडो ते हजारो वेळा करावे लागलेले आहे, तेव्हा त्यांच्या प्रयत्न सफल होऊन ते यश प्राप्त करू शकले. एकट्या एडिसन च्या नावाने किती तरी शोध आहेत. पंधराशे पेक्षा अधिकच असावेत ! एडिसन हे संशोधनाविषयी बोलताना असे म्हणतात कि – ‘माझा असा विश्वास आहे कि, मानवाच्या यशामागे एक टक्का बुद्धी आणि नव्व्याणव टक्के प्रयत्न असतात.’ प्रगतीचे शिखर गाठलेले देश प्रयत्नांच्या भक्कम पायावर उभे आहेत. पुरातन मोठमोठ्या लेण्या. ताजमहाल, किल्ले , तसेच आपले पर्यटक देशो -देशोदेशींचे जे अजूबे बघण्यासाठी जातात ते एका दिवसात तयार झालेले नाहीत. या आपल्या लेण्यांच्या  निर्मिती साठी हजारोच्या संख्येत कारागीर कित्येक वर्षे  सातत्याने छन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने डोंगर फोडून त्यांना लेण्याचे आकार देण्याचे दिव्य कार्य करीत राहिले. हे त्यांच्या प्रयत्नाचे यश होय. आज आपण बघत आहोत. म्हणून प्रयत्नवाद हा स्थळकालातीत आहे. १७ व्या शतकात शून्यातून स्वराज्य निर्मिती करणारे काय किंवा २०व्या शतकातील कृत्रिम हृदय, आणि मेंदूचे आरोपण करणारे शास्त्रज्ञ काय हे सारे यत्नदेवाचे निस्सीम उपासक होत. अपयश हि यशाची पहिली पायरी समजून पूण: पुन्हा चिकाटीने प्रयत्न करणारेच स्वतःचे ध्येय गाठू  शकतात. यत्न देवाच्या आशीर्वादाने मुका बोलू लागतो. पांगळा धावू लागतो. याच प्रत्यय आपण बाबा आमटे यांच्या आनंदवनात आंधळे फुटबॉल खेळतात, सुंदर सुंदर वस्तू तयार करतात. चटया विणतात, वायरच्या साहाय्याने खुर्च्या विणतात. हात नसताना पायांद्वारे हार्मोन  वाजवितात. असे अजून कीत्येक कलाकार आहेत अपंगत्व असूनही प्रत्येक कार्यात यश प्राप्त करून यशाच्या शिखरावर पोचलेले. सुवर्णपदक मिळविलेले यशस्वी जीव आपण बघतच आहोत ते त्यांचे प्रयत्नानेच सिद्ध करून पुढे गेलेत.

पूर्वीचे असाध्य असणारे कुष्ठरोग, कर्करोग, क्षयरोग,त्वरित उपचार केल्यास बरे होत असल्याचे आपण बघतो. कवी कल्पनेतील चन्द्र, तारका खगोलशास्त्रातील प्रयत्नांमुळेच  मानवी कक्षेत आल्या आहे. रेडिओ, टी. व्ही., कम्प्युटर, लॉपटॉप, निरनिराळे मोबाइल्स, वाशिंग मशीन, रेफ्रिजिरेटर, ऐअरकंडीशनर, त्याचेही निरनिराळे फेरबदल करून मार्केट मध्ये उपलब्ध होतात. निरनिराळ्या कार्यासाठी मोठमोठी उपकरणे, मशिन्स यांचे शोध होत आहेत हे सर्व प्रयत्नाने होत असतात. रोजच्या जीवनात सुद्धा थोट्या थोट्या गोष्टी साध्य करण्यासाठी अगदी उठल्या पासून तर झोपे पर्यंतच्या मधल्या कालावधीत मनुष्याला किती प्रयत्नशील असावेच लागते. हे प्रत्येकाला माहित आहे. मानवी जीवन लहान असले तरी करण्यासारखे खूपकाही आहे. हे जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी वेळ फुकट घालवून चालणार नाही. त्यासाठी सतत कार्यरत असायलाच पाहिजे. प्रयत्नात असायला पाहिजे. घरातील अडीअडचणींवर मात करण्यासाठी मनुष्याने प्रयत्नशील असावे. आज समाजात ज्यांना मानाचे स्थान प्राप्त झालेले जितके महान व्यक्ति आपण बघतो, ते सर्व आपापल्या कार्यात सतत प्रयत्नशील राहूनच मोठे स्थान प्राप्त करू शकलेले आहेत. जो प्रयत्नांचा  मार्ग स्वीकारतो तोच यशाचे शिखर गाठतो. स्वामी विवेकांनदांनी भारतीय तरुणांना दिलेला संदेश सर्वांनीच लक्षात ठेवला पाहिजे तो असा ‘ उत्तिष्ठत,जाग्रत.’उठा ! जागे व्हा ! ..केल्यानेच होत  असते ! फार  पूर्वीची ” केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ” हि समर्थ रामदासांची उक्ती आहे.  आपल्या संत मंडळींनी प्रयत्नाचे महत्व सांगितलेले आहे. कोणत्याही कार्याची सिद्धी प्रयत्नां शिवाय होत नाही. – प्रयत्न हा स्थळ कालातीत –  जीवन सुखी होण्यासाठी कार्यतर राहणे फार महत्वाचे आहे.

प्रयत्नवादाचे महत्व विशद करताना स्वामी समर्थ रामदास म्हणतात – ‘प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही  गळे ‘  त्याच प्रमाणे  तुकाराम महाराज म्हणतात – असाध्य ते साध्य | करीता सायास| कारण अभ्यास |तुका म्हणे ||  सायास म्हणजे प्रयत्न होय. प्रयत्न केला तरच असाध्य गोष्टी देखील प्राप्त होतील. परमार्थ  साधन करणारे संत हे प्रयत्नांचे महत्व पुन्हा पुन्हा सांगतात. ते प्रयत्नालाच परमेश्व्रर  मानतात. यश, कीर्ती,वैभव हे फल स्वरूप आहे. गँलिलीओ, न्यटन ,जगदीशचंद्र बोस, आइनस्टाइन, सी. व्ही. रामन, अब्दुल कलाम यांसारख्या शास्त्रज्ञानी विज्ञानक्षेत्रात  मोलाचे संशोधन केले आहे. यांत यश त्यांना एकाच प्रयत्नात मिळालेले नाही, एक एक प्रयोग शेकडो ते हजारो वेळा करावे लागलेले आहे, तेव्हा त्यांच्या प्रयत्न सफल होऊन ते यश प्राप्त करू शकले. एकट्या एडिसन च्या नावाने किती तरी शोध आहेत. पंधराशे पेक्षा अधिकच असावेत ! एडिसन हे संशोधनाविषयी बोलताना असे म्हणतात कि – ‘ माझा असा विश्वास आहे कि, मानवाच्या यशामागे एक टक्का बुद्धी आणि नव्व्याणव टक्के प्रयत्न असतात.’ प्रगतीचे शिखर गाठलेले देश प्रयत्नांच्या भक्कम पायावर उभे आहेत. पुरातन मोठमोठ्या लेण्या. ताजमहाल, किल्ले , तसेच आपले पर्यटक देशो -देशोदेशींचे जे अजूबे बघण्यासाठी जातात ते एका दिवसात तयार झालेले नाहीत. या आपल्या लेण्यांच्या  निर्मिती साठी हजारोच्या संख्येत कारागीर कित्येक वर्षे  सातत्याने छन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने डोंगर फोडून त्यांना लेण्याचे आकार देण्याचे दिव्य कार्य करीत राहिले. हे त्यांच्या प्रयत्नाचे यश होय. आज आपण बघत आहोत. म्हणून प्रयत्नवाद हा स्थळकालातीत आहे. १७ व्या शतकात शून्यातून स्वराज्य निर्मिती करणारे काय किंवा २०व्या शतकातील कृत्रिम हृदय, आणि मेंदूचे आरोपण करणारे शास्त्रज्ञ काय हे सारे यत्नदेवाचे निस्सीम उपासक होत. अपयश हि यशाची पहिली पायरी समजून पूण: पुन्हा चिकाटीने प्रयत्न करणारेच स्वतःचे ध्येय गाठू  शकतात. यत्न देवाच्या आशीर्वादाने मुका बोलू लागतो. पांगळा धावू लागतो. याच प्रत्यय आपण बाबा आमटे यांच्या आनंदवनात आंधळे फुटबॉल खेळतात, सुंदर सुंदर वस्तू तयार करतात. चटया विणतात, वायरच्या साहाय्याने खुर्च्या विणतात. हात नसताना पायांद्वारे हार्मोन  वाजवितात. असे अजून कीत्येक कलाकार आहेत अपंगत्व असूनही प्रत्येक कार्यात यश प्राप्त करून यशाच्या शिखरावर पोचलेले. सुवर्णपदक मिळविलेले यशस्वी जीव आपण बघतच आहोत ते त्यांचे प्रयत्नानेच सिद्ध करून पुढे गेलेत.

पूर्वीचे असाध्य असणारे कुष्ठरोग, कर्करोग, क्षयरोग,त्वरित उपचार केल्यास बरे होत असल्याचे आपण बघतो. कवी कल्पनेतील चन्द्र, तारका खगोलशास्त्रातील प्रयत्नांमुळेच  मानवी कक्षेत आल्या आहे. रेडिओ, टी. व्ही., कम्प्युटर, लॉपटॉप, निरनिराळे मोबाइल्स, वाशिंग मशीन, रेफ्रिजिरेटर, ऐअरकंडीशनर, त्याचेही निरनिराळे फेरबदल करून मार्केट मध्ये उपलब्ध होतात. निरनिराळ्या कार्यासाठी मोठमोठी उपकरणे, मशिन्स यांचे शोध होत आहेत हे सर्व प्रयत्नाने होत असतात. रोजच्या जीवनात सुद्धा थोट्या थोट्या गोष्टी साध्य करण्यासाठी अगदी उठल्या पासून तर झोपे पर्यंतच्या मधल्या कालावधीत मनुष्याला किती प्रयत्नशील असावेच लागते. हे प्रत्येकाला माहित आहे. मानवी जीवन लहान असले तरी करण्यासारखे खूपकाही आहे. हे जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी वेळ फुकट घालवून चालणार नाही. त्यासाठी सतत कार्यरत असायलाच पाहिजे. प्रयत्नात असायला पाहिजे. घरातील अडीअडचणींवर मात करण्यासाठी मनुष्याने प्रयत्नशील असावे. आज समाजात ज्यांना मानाचे स्थान प्राप्त झालेले जितके महान व्यक्ति आपण बघतो, ते सर्व आपापल्या कार्यात सतत प्रयत्नशील राहूनच मोठे स्थान प्राप्त करू शकलेले आहेत. जो प्रयत्नांचा  मार्ग स्वीकारतो तोच यशाचे शिखर गाठतो. स्वामी विवेकांनदांनी भारतीय तरुणांना दिलेला संदेश सर्वांनीच लक्षात ठेवला पाहिजे तो असा ‘ उत्तिष्ठत,जाग्रत.’उठा ! जागे व्हा ! ..

The post केल्यानेच होत असते appeared first on Marathi Unlimited.

आज राष्ट्रीय चारित्र्याची गरज

$
0
0

The term “national character” is used to describe the enduring personality characteristics and unique life styles found among the populations of particular national states. This behavior is sometimes considered on an abstract level, that is, as cultural behavior without actual reference to necessarily different personality modalities. It may also be considered as motivated by underlying psychological mechanisms characteristic of a given people.

For more information kindly read following article.

Aata-Uthavu-Sare-Raan-Song-Lyrics-Deshbhakti-Geete-583x330

अत्यावश्यक  मुद्दे — राष्ट्रीय चारित्र्य म्हणजे राष्ट्रा तील जनतेचे चारित्र्य. –  तथापि राष्ट्रातील बहुसंख्य जनता स्वार्थी व नीतिमूल्यहीन. – शैक्षणिक,व्यावसायिक, सामाजिक,व शासकीय इत्यादी क्षेत्रांत राष्ट्रीय चारित्र्याचे हनन .- राष्ट्रीय चारित्र्य शुद्ध करण्याची जबाबदारी सरकार व जनता या दोघांचीही आहे. – उत्तम चारित्र्याचा आदर्श लहान,मोठी समोर ठेवलाच पाहिजे . ‘ देश म्हणजे देशातील माणसे, देशाची प्रगती हि त्या देशाच्या माणसांवरून ठरते. ‘ बहुसंख्य माणसे ज्या अवस्थेत असतील त्या अवस्थेवरून देशाची अवस्था ठरते. तदवत राष्ट्रीय चारित्र्य म्हणजे त्या राष्ट्रातील जनतेचे चारित्र्य वृक्षावरील एका फळा वरून साऱ्या वृक्षाची किंमत ठरते. तसेच राष्ट्राच्या एखाद्या व्यक्तीचा योग्यते वरून साऱ्या राष्ट्राची योग्यता ठरवली  जाते. म्हणून  राष्ट्रीय उत्तम राखण्याची जबाबदारी हि प्रत्येकाचीच आहे. स्वतःची जात, धर्म, प्रांत,भाषा इत्यादी सर्व भेद बाजूला सारून राष्ट्राचे हिट ते माझे हित, राष्ट्राचा मान तो माझा मान अशी निष्ठा बाळगून जर प्रत्यकाने वर्तन केले तर उच्च्तम राष्ट्रीय चारित्र्य भारतात जन्माला येईल.

आज खेदाने असे म्हणावेसे वाटते कि आज राष्ट्रीय चारित्र्य खालावलेले आहा. राष्ट्रातील बहुसंख्य जनता स्वार्थी ,आत्मकेंद्री झाली आहे. स्वतःच्या विचारापुढे तिला राष्ट्राचा विचार, तुच्छच वाटतो. असंखयांना नीतिमूल्याची चाड नाही. संम्पत्तीच्या लोभामुळे तस्कर,धर्मांध, नफेखोर, काळाबाजार करणारे तसेच देशातील पैसा विदेशात नेवून साठवण करणारे, भ्रष्टाचारी आमच्या राष्ट्र मंदिराला उंदीरघुसीप्रमाणे  पोखरत आहे. हि राष्ट्रविघातक शक्ती अन्य राष्ट्रासाठी हेरगिरी करून राष्ट्र कमकुवत करण्याच्या मागे लागलेले आहे. आपापसात भांडून एकमेकांचे लचके तोडत आहे. याचा फायदा इतर राष्ट्रांना उचलायला ठीकच असते. शैक्षणिक, व्यापारिक,व्यावसायिक ,सामाजिकांनी शासकीय. अशा सर्वच पातळींवरून राष्ट्रीय चारित्र्यायाचे हनन होत असते. आज आपण आपल्या विहित कर्तव्याची टाळाटाळ करितो. काही  ठिकाणी विद्यार्थ्यां पासून शैक्षणिक संस्थांना त्रास तर काही ठिकाणी शैक्षणिक संस्थानकडुन विद्यार्थ्यांना त्रास बहुतांश ह्याच घटना अमलात येत आहे. त्यामुळे मोर्चे, निदर्शने, घेराव,बंद इत्यादी घडवून आणून, शिक्षक विद्यार्थ्यांना त्रासून सोडतात, तर कुठे विद्यार्थी शिक्षकांना त्रासवून सोडतात. अगदी  अलीकडे तर चाकू सुरे घेऊन मारहाण किंवा खात्माच करण्यापर्यंत मजल गेलेली बघावयास   मिळते हे विद्यार्थी आणि शिक्षकवृंद यांचे हे खालावलेले चारित्र्यद्योतक म्हणावे लाभेल. तसेच व्यापारांनी जणू कोणताही माल शुद्ध स्वरूपात न देण्याचा चंगच बांधला आहे.प्रत्येक मालात भेसळ करूनच विकतात याची जराही खन्त त्यांना नसते. तसेच वाममार्गाने जास्त पैसा कमविण्याची कीड तर अघ्यापक, डॉ, यांच्या व्यवसायाला अधिकच लागलेली आहे. शासकीय क्षेत्रात प्रत्येक अधिकारी असो किंवा कर्मचारी किंवा क्लासफोर असिस्टंट, सेक्युरिटी सर्वांना हातावर दक्षिणा मिळाल्याशिवाय कर्म करायचीच नाही, असे ठरविलेलेच असते. शासकीय पातळीवर भ्रश्टाचार हा शिष्ट|चार झाला आहे.सार्वजनिक जीवनातील हि घाण निपटून काढण्यासाठी सुरवात करणे गरजेचे आहे.  यांस सर्वांचीच साथ हवी असते. राष्ट्रीय चारित्र्य निकृष्टावस्थेत नेण्यास सर्व सामान्य जनता  नेत्यांना जबाबदार धरते. परंतु ‘ यथा राजा तथा प्रजा ‘ ! याउलट सरकार हे जनतेचे प्रतिबिंब आहे; कारण जनतेतूनच लोक नेतेपदी निवडले जातात. म्हणून राष्ट्रीय चारित्र्यबांधणीसाठी दोन्ही पातळ्यांकडून प्रयत्न करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय चारित्र्याचे महत्व  भारतातील राजकर्त्यापासून  सामान्य माणसापर्यंत सर्वानीच पटवून घ्यायचे आहे. हि चारित्र्याची घडण प्रथम घराघरातून होणे आवश्यक आहे. घरातील कर्त्यव्यक्तींनी  उत्तम चारित्र्याचा आदर्श प्रथम मुलांसमोर ठेवला पाहिजे. मुले,मुली,तरुण हेच राष्ट्राचे आधार आहे. त्यांच्यात देशाभिमान,धैर्य,नीतिमत्त्ता,संयम, निस्वार्थ बुद्धी निर्माण करणे आवश्यक आहे. देशाबद्दलची नितातं  भक्ती त्यांच्या मनात रुजेल असेच संस्कार असायला हवे. त्यासाठी मुलांच्या  क्रमित पाठयक्रमाच्या पहिल्याच पृष्ठावर प्रतिज्ञा दिलेली असतेच. शिक्षण संस्थामधून ती म्हटल्या गेलीच पाहिजे असे रूळ अवश्य असावे. मुलांना त्याचा अर्थ कळला पाहिजे व  त्याच प्रमाणे वर्तन घडले पाहिजे याची दक्षता घ्यावी.  राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, व राष्ट्राची इतर मानचिन्हे हे प्रत्येकाचे मानबिंदू ठरणे आवश्यक आहे.  याचा अपमान कोणीही सहन करता कामा नये. अपमान करणाऱ्यास कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे. व्यपारांनी माफक नफा घेऊन निर्भेळ वस्तू पुरविल्या पाहिजे. व्यवसायिकांनी स्वतःच्या व्यवसायाचे पावित्र्य टिकविलेच पाहिजे. प्रत्येकाने जास्तीत जास्त आपल्या देशी मालाचा वापर करून आपल्या देशाचे भाग्य साधले पाहिजे.  विदेशी मालाचा बहिष्कार करायलाच पाहिजे. प्रत्येक व्यापाराने आपला माल उत्कृष्ट असावा त्यात कुणीही काहीच दोष काढणार नाही, अशी त्याने  खात्री करून घ्यावी.यालाच म्हणतात राष्ट्रीय चारित्र्य जोपासणे, सांभाळणे. असे केल्यास भारताची मान व शान उंचावण्यास विलंब लागणार नाही.

The post आज राष्ट्रीय चारित्र्याची गरज appeared first on Marathi Unlimited.

शेत जमीनीची कमतरता

$
0
0
While agricultural productivity has risen dramatically, the cost in land degradation has been high. Large areas of the region’s cropland, grassland, woodland and forest are now seriously degraded. Water and wind erosion are the major problems but salinity, sodicity and alkalinity are also widespread; water tables have been over-exploited; soil fertility has been reduced; and where mangrove forest has been cleared for aquaculture or urban expansion, coastal erosion has been a common result. Finally, urban expansion has become a major form of land degradation, removing large areas of the best agricultural land from production.For more information kindly read following article.

gurgaon_1496915679_725x725

भारत हा कृषी प्रधान देश आहे हे खरेच आहे. पूर्वीच्या भारतात ९० टक्के खेडी होती. त्यामुळे हे म्हणणे योग्य होते. परंतु आता खेड्यातील जनतेची धाव शहराकडे असल्या कारणाने शेती करणे हा व्यवसायच दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे शेतजमिनीचे क्षेत्रफळ दिवसेंदिवस फार कमी होत जात आहे.

आता हे चित्रच नेमके उलटे दिसत आहे.सर्व चैन,सुख,रोजगाराची उपलब्धता.शहरात दिसत असल्याने खेड्यातील  जनता खेडी सोडून शहराकडे घावत आहे. फुटपाथवर राहावे लागते, वाममार्गाने पैसे मिळवावे लागते. अर्ध पोटी राहावे लागले तरी खेड्यातून शहराकडे आलेली जनता परत खेड्यात जावू इच्छित नाही. काही शिक्षणाच्या तर काही रोजगाराच्या निमित्ताने शहरात येतात. मग खेड्यात उरतात ती म्हातारी, वयोवृद्ध, कमजोर, हतबल मनुष्य आणि त्या ओसाड जमिनी वाडया, बागा या दुर्दैवी जीवांना कोणी वाली नसत.

वास्तविक शहरी जीवनात अनेक भयावह समस्यां निर्माण झालेल्या आहेत. आणि प्रतिदिन त्यानं नवीन भर पडतच आहे. अफाट गर्दी,गोंगाट, हवा-पाणी अन्न यासर्वांचे प्रदूषण त्यापासून होणारे दुष्परिणाम शहरवासीयांना भोगावे लागत आहे.  अस्वच्छता, निवार्याची समस्यां हि तर कधीच नसुटणारी आहे. शहरातील लोकसंख्या वाढल्याने प्रत्येकाला रोजगार मिळतोच असे नाहो. तरीपण येथील रंगीबेरंगी जीवनाला चटावलेले माणूस खेड्याकडे पाठ फिरवून शहराकडील अनारोग्यकारक आणि आत्यन्तिक अशा गैरसोयीच्या वातावरणात रहायला तयार होतो आणि हे जिवन असहाय झाले कि व्यसनाच्या आधीन होतो. जिवन संपवण्यास तयार होतो. पण तो आपल्या शेत व्यवसायाकडे फिरकत नाही.

” तुझे आहे तुज पाशी ,तरी तू जागा चुकलासी” अशी स्थिती आज झालेली आहे. जसे खो,खो खेळातील खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध तोंडे करून बसतात. तसे हात आणि मन एका बाजूला,व संधीची तोंडे दुसऱ्या  बाजूला आहेत. तसेच मनुष्याचे आहे हात आणि मने शहरांकडे धाव घेत आहे, तर असंख्य संधी खेड्यात उपलब्ध होत आहेत.ज्या हातांना काम करण्याची इच्छा आहे पण काम मिळत नाही असे हे हात खेड्यातील कामात गुंतवले जाऊ शकतात.

आत तर खेड्यातही रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या जात आहे. तेव्हा तेथील लोकांनी तेथील गरजांनुसार उद्योग धंदे, धंदेशिक्षण देण्याच्या तांत्रिक शाळा जास्तीत जास्त प्रमाणात सुरु केल्या पाहिजे. तर खेड्यातील युवकांना आपले खेडे सोडून जाण्याची गरज राहणार नाही. आवश्यकतेनुसार शिक्षण झाल्या नंतर  खते रसायन तयार करण्याचे तंत्रप्रशिक्षण, तसेच अवजारे तयार करण्याचे व शेतीव्यवसायाचे शास्त्रीय, प्रगतज्ञान देणारे प्रशिक्षण स्थानिक पातळीवर देण्यात यावे, हे प्रशिक्षण

देण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात यांचे कारखाने उघडावे म्हणजे एकाच वेळी प्रशिक्षण व रोजगार दोन्ही उपलब्ध होतील. ज्यांची स्वतःची जमिनी असणारी मंडळी शेती व्यवसाय करून इतर कुकुटपालन,  दुग्धव्यवसाय, पशुउत्पादन. वीटभट्टी उद्योग, गोटफार्म, इत्यादी पूरक व्यवसायाकडे वळतील. हे सर्व कारखाने व प्रशिक्षण विद्यालये सरकारी तत्वावर उभारल्यामुळे  सरकारच्या मदतीने

खेड्यांचा सर्वांगिक विकास झाल्यास शेतीच विकास व शेतकरी समाजाचा विकास झाल्याने शेतीचे क्षेत्रफळ कमी होणार नाही व शहरातील निवार्याची समस्यां कमी होईल

The post शेत जमीनीची कमतरता appeared first on Marathi Unlimited.

आपले विचार सूत्र

$
0
0
Mind is the most sophisticated gift given to humans to live a life of higher purpose. Mind is a bundle of thoughts. It is said “What you think you become”. Thoughts are solely responsible for successes or failures and sorrows or happiness. It is important to regulate your thoughts so that you are able to make the most of your life. There are a few easy ways you can develop good thoughts. 1) Do meditation and yoga asanas, 2)Look at the mirror and smile,3)Be in the company of good people etc.
For more information kindly read following articlehqdefault

नियमांवर विश्वास ठेवू अथवा नका ठेवू.  ते आपलं काम अखन्डपणे करतच राहणार. निसर्गाच्या नियमांची हि म्हत्वपूर्ण गोष्ट आहे. उदा आपण आगीत हात घातला तर तो भाजणारच. आपल्याला ते माहित असो व नसो.त्याने काहीच फरक पडत नाही. कारण हा एक अलिखित नियम होय. कारण हे आपल्या विश्वासावर चालणार नाही. दोन्ही परिस्थितीत हात भाजणारच हे निर्विवाद सत्य आहे. हे स्वयंपुर्ण आहे. त्यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. निसर्गाचा प्रत्येक नियम तोपर्यंत आपला  मालक आहे. जोपर्यंत आपण त्याला जाणत नाही. हि बाब भौतिक नियमांना लागू होते, परंतु मानसिक नियमांना लागू पडेल असे नाही.

विचार नियम नुसार प्रत्येक विचारांची निर्मिती प्रथम विचारांत होते. आणि मग भौतिक रूपात. हे व्यक्तव्य अत्यन्त म्हत्वपूर्ण आहे. आपण जे काही पहात आलो त्याची निर्मिती प्रथम  विचारांत व  नंतर ते वास्तवात साकार होते.

विश्वात कोणतीही वस्तू भौतिक रूपात निर्माण होण्याआधी प्रथम तिची निर्मिती वैचारिक थरावर होत असते.

जगात दोन प्रकारची लोक असतात, एक प्रकार म्हणजे ते  स्वतःच्या जीवनाचे मालक असतात. दुसरे म्हणजे जीवन त्यांचे मालक असते. आपण आजूबाजूला बघतो, लोकांचे बोलणे ऐकतो, डोळे कां उघडे ठेवले कि सर्व काही दृष्टीस पडते.  तेव्हा काही आनंदी व यशस्वी दिसतात. काही विकसित तर काही अविकसित. विकसित लोकांच्या बाबतीत म्हणजे त्यांनाकाही विशेष नियम किंवा शक्ती विषयी ज्ञान असत. त्याउलट अविकसित लोकांत असे आढळून येईल कि ते प्रत्येक क्षण दिवसाचे चोवीस तास अगदी त्यांच्यासाठी शिक्षाच असल्या सारखे कार्य करतात.

The post आपले विचार सूत्र appeared first on Marathi Unlimited.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे

$
0
0

Tree-planting is the process of transplanting tree seedlings, generally for forestry, land reclamation, or landscaping purpose. It differs from the transplantation of larger trees in arboriculture, and from the lower cost but slower and less reliable distribution of tree seeds. Trees absorb odors and pollutant gases (nitrogen oxides, ammonia, sulfur dioxide and ozone) and filter particulates out of the air by trapping them on their leaves and bark.

For more information kindly read following information.

plant-tree-for-earth-day

मुद्दे -:  त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सत्पुरुषाप्रमाणेच असतात. –  निसर्ग हा साहित्याचा अविभाज्य भाग.-  मानवाने केलेली बेसुमार जँगलतोड. – वने हि राष्ट्रीय संपत्ती.-  वनमहोत्सव हा राष्ट्रीय सण,-  शिक्षण संस्थेद्वारे  वृक्ष संवर्धनाचे उपक्रम होणे आवश्यक आहे. – वृक्ष संवर्धन हेच आजचे मोक्षसाधन होय.

‘ छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे, फलान्यपि परार्थाय वृक्षा सत्पुरुषां इव,| जे त्यागाच्या भावनेने स्वतः उन्हात उभे राहतात, इतरांना सावली देतात. ज्यांची फळे -फुले हि दुसऱ्यासाठीच असतात. असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सत्पुरुषाप्रमाणे अटळ असतात.

या वृक्षरूपी सत्पुरुषांचे सानिध्य अबालवृद्धांना, सामान्य जणांना व त्याच बरोबर अलौकिक विभूतींनाही लाभावे असे वाटते. म्हणूनच ऋषीमुनी रानावनात वस्ती करून निसर्गाच्या सानिध्यात

अध्ययन, अध्यापन आणि तपश्चर्या करीत असतात. निसर्गातील गूढ उकलण्याचा प्रयत्न करितात.

साहित्यिकांच्या जीवनात आणि साहित्यात निसर्ग एक अविभाज्य भाग आहे. तो सावली सारखा त्यांच्या सोबत वावरत असतो. संत काव्यात पानापानांवर वृक्षवेलींच्या उपमा,संज्ञा व दृष्टांत दिसतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात -‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरी ”

इंदिरा संत म्हणतात – ” जरी वेढिलें चार भिंतींनी,या वृक्षांची मजला संगत ” सामान्य मनुष्य नेहमीच्या संसारिक त्रासापासून, विचारांपासून दूर हवापालट म्हणून थंड हवेच्या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यातच जातो.

अश्या उपकारकर्त्या वृक्षांचा आज ऱ्हास होत चालला आहे. एकूण भूभागापैकी एकूण एक तृतीयांश जमीन वृक्षराजींनी व्यपलेली असलीच पाहिजे, तरच निसर्गाचा समतोल  राखला जातो. आपल्या भारतात हे अत्यंत कमी म्हणजे एक पंचमांश पेक्षाही कमी आहे. पूर्वी हिमालयातील उतरंड, मध्य प्रदेश, आसाम, ओडिसा आणि बंगालच्या गंगेंच्या मुखाजवळील येथेच घनदाट असे जन्गल होते.

परंतु आता तेथेही मानवाने कमी अधिक जँगलतोड करून वस्त्या तयार केलेल्या आहेत. तसेच जिकडे तिकडे बेसुमार जन्गल तोड होत आहे. मानवाने वैराण असे वाळवंट तयार केलेली आहेत. म्हणतात  कि ‘ मानवाचे पाऊल नि वाळवंटाची चाहूल ‘ अशी  म्हणच  आहे. जोपर्यंत मानवी वस्ती कमी होती, तोपर्यंतच वृक्षवल्लीचे प्रमाण जास्त होते.  पूर्वी जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतशी जमीन शेती खाली आणली जाऊ  लागली.  जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी वृक्षांची बेसुमार तोड झाली.  त्यामुळे उष्णता वाढली पावसाचे प्रमाण कमी होत गेले. जमिनीची धुप होऊन जमीन नापीक होत गेली. पावसा अभावी त्यामुळे दुष्काळाचे प्रमाण वाढले. त्यामुळे खेडोपाडी, गावाकडील शेतकऱ्याचे शेतीवरील लक्ष लागेनासे झाले, त्यामुळे तो आळशी होत गेला.  असेच हळू हळू त्याचे शेती वरील राबाई  , मेहनत करण्याची प्रवृत्ती कमी होत गेली. आणि आता प्रत्येकाची धाव चमचमत्या शहराकडे लागलेली  आहे. प्रत्येक जण शहराकडे धाव घेत असल्याने शरीरातील लोकसंख्या वाढीस लागली. आता लोकवस्त्यांसाठी शेतजमिनीचा वापर प्लॉट पाडण्यात होऊ लागला, त्यामध्ये मुबलक पैसा शेतकऱ्यास मिळत गेला. मेहनतीशिवाय पैसा भरपूर मिळतो तर कोण राबणारं असेच त्याचे विचार बदलत गेले. प्रत्येक शेतकऱ्यास शेत जमीन विकनेच योग्य वाटले. त्या कारणाने लोकवस्त्या वाढतच गेल्या आज अशी परिस्थिती आहे. जागा कमी असंल्याने कमी जागेत उंच इमारती बनत गेल्या.  शहर विस्तार वाढतच गेलेला आणि खेडेगाव व शेत जमिनीचा विस्तार अतिशय कमी होत चाललेला आपण बघत आहोत. अश्या या सिमेंटीकरन शहरांत वृक्षांना कोठे जागा मिळणार.

आपल्या पूर्वजांनी मानवी जीवनात वृक्षांना महत्व दिले होते. तुळशी,वड,पिंपळ,औदुंबर यांची पूजा केली जात असे. तसेच बेल,दुर्वा,धोत्रा यांना आणि अन्य अशा वनस्पतींना देवाच्या पूजेत स्थान दिले होते. त्यामुळे वृक्षांची आपोआपच जपणूक होत असे आणि त्यांच्या बद्दल कृतज्ञताहि व्यक्त होत असे. परंतु हळूहळू हि श्रद्धा लोप पावत आहे.

वने हि राष्ट्रीय संपत्ती आहे. ते खनिज संपत्ती सारखे ओहोटीस लागणारे धन नाही.ज्या प्रमाणे ज्ञानेश्ववरांनी म्हटलेले आहे -” मोगरा फ़ुलला, मोगरा फुलला| फुले वेचिता बहरू कळियांसी आला|” त्याच मोगर्या प्रमाणे पुनर्निर्माणाची शक्ती असलेल्या संपत्तीचा हा ओघ आहे. म्हणूनच सरकारने वन महोत्सव हा राष्ट्रीय सण मानलेला आहे. कित्येक जमिनी गवत व जळाऊ लाकडांच्या लागवडींखाली आणण्यात येत असते. तसेच सामाजिक मोहिमेखाली वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व वृक्षसंरक्षण यांसाठी कसोसिने  प्रयत्न होत असते.

सांगावेसे वाटते सामान्य जनतेलाही यासाठी सहजपणे पण खूपकाही करण्यासारखे आहे. त्यासाठी वेगळ्या प्रयत्नांची आवश्यकता नसते.  पण इच्छाशक्ती ची गरज आहे. आपणच वृक्षतोड हि थांबविली पाहिजे, पुष्कळ असे सामाजिक कार्यक्रम किंवा सांस्कृतिक कार्यक्रम राबवताना किंवा साजरे करताना

‘ एक मुलं आणि एक झाड ‘असे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाची प्रथा पाडावी. कुठलेली झाड तोडण्यापूर्वी दुसरे झाड लावण्याची सक्ती असावी. महापालिकांनी झाडे तोडण्याविरुद्ध सक्त कायदा ठेवावा. जनतेला घर घरासमोर झाडे लावण्यास रोपेंहि द्यावीत मधून मधून झाडांचे निरीक्षण करून जनतेला त्यांच्या घर समोरील झाडांचे संगोपन करण्या बाबत उत्साहित

करावेत. त्यांना नगरसेवकांतर्फे झाडांच्या संरक्षणार्थ जाळीचे कटघरे द्यावीत. मोठमोठ्या पटांगणावर, मंदिरांसमोर रिकाम्या जागी झाडे लावण्यात जनतेला प्रोत्साहित करावे,त्याबाबत त्यांना मोफत मदत करावी.

कालमापनाप्रमाणे व्रतवैकल्यांचे तसेच धार्मिक कार्यक्रमाचे स्वरूप बदलत असते. किंवा पुरातन असले तरी. वड, पिंपळ, कडूंनीब, अशा रोपांचे वाटप करून सामाजिक कार्यक्रम ज्या ठिकाणी, पटांगणावर साजरे करण्यात येतात तेथे एखादे सुट्टीचे दिवशी थोडा खर्च करून नेत्यांनी कार्यकर्त्याकडून वृक्षरोपणाचा कार्यक्रम आखावा,व जनतेलाही उत्साहित करावे. कारण वृक्षसंवर्धन हेच आजचे मोक्षसाधन आहे. अनेक सामाजिक संस्था द्रुकश्राव्य माध्यमांद्वारे वृक्षसंवर्धनाच्या प्रसाराचे  कार्य करत आहेतच, आणि अजूनही मार्ग अनेक आहेत फक्त इच्छा असली पाहिजे हे महत्वाचे आणि सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. तरच आपलू भारतमाता ‘फुल्ल कुसुमाता दुमडलं शोभिनी’  या वर्णनानुरुप शोभू लागेल.

The post वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे appeared first on Marathi Unlimited.

झिजावे परी कीर्ती रूपे उरावे

$
0
0
The farmer is one of the most useful people of since the beginning of civilization. We all depend upon agriculture to meet our requirement of food. We get our food because the farmer grows crops and carries the agricultural activities. Though, they feed the entire humanity, their life conditions are far from satisfactory.The life of a farmer is very tough. He works very hard day and night in all seasons. During summer, he works under the heat of the sun. During winter season, he gets wet while ploughing the field. During winter, he carries on his hard work in spite of the dull and cold weather.
For more information read following article.
India_Farming-553x360
भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्याला तसेच जपायचे आहे.
आपण शेती करतो पृथ्वीची झीज होते. पृथ्वी आपल्यासाठी झिजून आपणास धान्य देते. तेव्हा तिचा कस,तिचे सत्व कमी होते.आपण तिची झीज भरून काढायलाच पाहिजे. आपण तिला नांगरून ठेवतो. सूर्याची उष्णता तिच्या आंत शिरते, आपण तिच्यात खत घालतो, या नुसार तिचा कस भरून काढत असतोच. असेच आपण पृथ्वीसाठी तिचा कस कमी होऊ नये म्हणून तिला, उन्हात उभे राहून नागरतो, पैसे खर्च करून खतपाणी घालतो,हि शारीरिक व आर्थिक झीज आपण तिच्यासाठी केली तर ती उत्कृष्ट पीक देऊन त्याची भरपाई करतेच, तेव्हा ती आपल्यासाठी झिजते व आपण तिच्यासाठी झिजायलाच पाहिजे. असे आपण केले नाही तर आपणच एक दिवस दुखी होऊ.एकमेकांसाठी झीज हि सोसावीच लागते. पृथ्वी व शेतकरी हे दोघेही परस्परांची झिजतात. त्याच प्रमाणे मालकांनी मजुरांसाठी व मजुराने मालकांसाठी त्याग प्रवृत्तीचा अवलंब केला पाहिजे त्यायोगे समाजात समता व आनंद राहील. एकमेकांसाठी झटले तरच आजचा मानव सुखी होऊ शकेल.

The post झिजावे परी कीर्ती रूपे उरावे appeared first on Marathi Unlimited.

अध्यात्म

$
0
0
Spirituality is a broad concept with room for many perspectives. In general, it includes a sense of connection to something bigger than ourselves, and it typically involves a search for meaning in life. As such, it is a universal human experience—something that touches us all. People may describe a spiritual experience as sacred or transcendent or simply a deep sense of aliveness and interconnectedness.
For more information read following article.

science-and-spirituality-705x350

भक्तिभाव
ईशवराचे भजन, पूजन, कीर्तन , प्रार्थना,नामसमरण, उपवास, व्रत, होमहवन, जपतप इत्यादी गोष्टी करण्यास साधारणपणे भक्ती असे म्हंटले जाते , आणि हि भक्ती ज्या भावनेतून केली जाते त्याला भक्तिभाव असे म्हणतात. भक्तिभाव हि एक विशिष्ट मानसिक भावना आहे. ती भावना मनात निर्माण करण्याकरिता ज्या क्रिया करण्यात येतात तिला भक्ती असे म्हणतात. प्रत्येक धर्मानुसार भक्तीचे स्वरूप निरनिराळे दिसून येते. परंतु भक्तिभाव हा मनुष्याच्या धर्मावर अवलनबुन नसून मुख्यत्वे त्याच्या ज्ञानावर अवलनबुन असतो. मनुष्य भक्ती करतो कि नाही यापेक्षा त्याच्या मनात भक्तिभाव आहे कि नाही हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे. कारण आज बाह्यतः अनेक व्यक्ती भक्ती करताना दिसतात. परंतु त्यांच्या मनात भक्तिभाव असतोच असे नाही. आताशा; भक्तिभाव पेक्षा भक्तीलाच जास्त महत्व दिलेले दिसतेय. निरनिराळे धर्म व धार्मिक पंथ यांच्या अनुयायांची वाद, भांडणे, मारामार्या, लढाया या त्यांच्या मुळाशी हे आचार विषयक मतभेद असतात. भक्ती आणि भक्तिभाव यांच्या मधील यातील फरक लक्षात आल्यास हे कलह कमी होऊ शकतात.परमार्थ किंवा व्यवहार यात भक्तिभावाला खरे महत्व असून भक्तिभावाशिवाय नुसत्या भगवतीच्या बाह्य आचरणाला विशेष किंमत नसते सर्व विश्वाच्या कारभाराचे नियंत्रण करणारी कोणीतरी एक सर्व सामर्थ्य संपन्न शक्ती विश्वाच्या मुळाशी आहे. जागतिक सर्व स्थावर जगम पदार्थ म्हणजे त्या शक्तीने आपल्या अतर्क्य लीलेने धारण केलेली निरनिराळी रूपे आहेत. तिच्या प्रेरणेने विश्वातील सर्व कारभार चाललेला आहे. एक झाडाचे पण सुद्धा त्या अतर्क्य शक्तीच्या इच्छे विरुद्ध हळू शकत नाही. हीच जांबिव मनुष्याच्या बुद्धीला झाली म्हणजे त्याच्या मनात जी भावना निर्माण होत असते त्याला भक्तिभाव असे म्हणता येईल. अतर्क्य शक्तीला ईशवर म्हणतो व भक्तिभावाला ईशवर निष्ठा म्हणतात. भक्तिभावाने सुपरिणाम व्यवहारात अनेक प्रकारे दिसतात. भक्तिभाव हि दैवी भावना आहे. हि असामान्य आहे. ज्यांच्या मनात ती असते त्यांच्या मनात आसुरी भावनांना प्रवेश मिळू शकत नाही. मनात उत्कृष्ठ भक्तिभाव असला म्हणजे अनिष्ठ भावनांना तेथे ठार मिळत नाही. हा अनुभव व्यवहारात येतो. अहंकार, भीती, दुःख, क्रोध द्वेष, लोभ, सूद इ. अनिष्ठ भावना भक्तिभाव युक्त मनुष्यात कधीच दिसत नाही. त्यांच्या मनाची शांती कधीच नष्ट होत नाही. मनुष्याची स्थिती आयुष्यभर एक सारखी राहू शकत नाही, प्रत्येकाची स्थिती कालामाना नुसार बदलतेकधी भरभराटीचे दिवस असतात तर कधी अपयशाचे , कधी संकटे हात धुऊन पाठीमागे लागतात. या दोन्ही परिस्थितीत सामान्य मनुष्याची मनोवृत्ती निरनिराळ्या प्रकारची असते, भरभराटीच्या काळी सामान्य मनुष्याचा अहंकार प्रगट होतो. त्यामुळे भरभराटी नंतर पुन्हा अधोगतीला गेलेली उदाहरणे कितीतरी आहेत.ज्यांच्या मनात खरा भक्तिभाव जागृत असतो ते सर्व,कर्ता करविता परमेशवर आहे या गोष्टीची जाणीव सदोदित मनात बाळगतात. सुखात-दुःखात ते परमेशवराला धन्यवाद देतात. त्यांच्या अंगी विनयशीलता, नम्रता,सौजन्य, भूतदया, सहानुभूती दिसत असते.
कर्म करणे आपल्या हाती आहे त्याचे इष्ट्फळ मिळणे किंवा न मिळणे हे परमेश्व्राच्या आधिन आहे. अशी भावना मनात जागृत असली म्हणजे दुर्गुण किंवा अनिष्ठ भावना हे डोके वर काढीत नाही. यांच्या कुठल्याही कार्यात इतरां कडून कधीही अडथळे होत नाही. त्यांची भरभराट होत असते. भरभराटीच्या काळी मनाला भडकू न देणारे व आपत्तीच्याकाळी मनाला अभय करून शांती व धैर्य देऊन त्यांचा उत्साह वाढविणारे भक्तिभावासारखे दुसरे औषध नाही असे म्हणणे योग्य होय.भक्तिभाव मनुष्य आपत्तीने दबून जात नाही. किंवा संकटाना डगमगत नाही. ज्या अनिष्ट घटना घडत आहे त्याच्या मागे परमेशवराचा काही शुभ हेतू असावा हा उद्देश ठेवून त्याचा शांततेने स्वीकार करतात. त्यांची मने सदैव स्थिर असतात त्यामुळे संकटांची तीव्रता त्यांना भासत नाही. त्यातून सुखरूपपणे बाहेर पडतात. परमेशवर आपल्याला मदत करतो अशी निश्चित भावनाच त्यांच्या मनी वसंत असते. भक्तिभाव युक्त मनुष्य हा जगातील सर्व मनुष्यप्राणी यांना ईशवर रूपे मानूनच व्यवहारात वागतो. सर्व कर्मे करताना आपण ईशवराचीच सेवा करीत आहोत अशी भावना असते.
व्यवहारातील प्रत्येक काम उत्तम प्रकारे करावे म्हणजे ती सहज व समाधान कारक होतात. त्याच्याच अंगचे कौशल्य दिवसेंदिवस वाढत जाते. त्यांच्या विषयी लोकांच्या मनात आदर व आपुलकी वाढते, व्यवहारात तो जास्त यशस्वी व सुखी होतो. ऐहिक जीवनात त्याचा दिवसेंदिवस उत्कर्ष होत जातो. आणि परमार्थिक दृष्ट्या त्याचे कल्याण होते. ईशवरार्पण भावनेने आपले कर्तव्य करीत राहणे हाच खरा भक्तिभाव होय. त्याच व्यक्तीला ईशवर सदा सहाय्य करितो.

मनुष्य कितीही दुराचारी असला तरी त्याच्या मनात खरा भक्तिभाव जागृत झाला तर तो साधू किंवा धर्मात्मा होतो. त्याच्या हातून दुराचरण होऊ शकत नाही. त्याची सर्व दुःख नाहीशी होतात. सर्व भावाने ईशवराला शरण गेल्याने परमशांती मिळते त्याची ईशवरावर अनन्य निष्ठा असते, त्याच्या प्रत्येक भावना शुद्ध होऊन तो ब्रम्हरूप होण्यास समर्थ असतो अखेर त्याला शाश्व्त सुख प्राप्त होते.

The post अध्यात्म appeared first on Marathi Unlimited.

आरोग्य

$
0
0
Good health is actively and purposefully behaving in ways that leave you stronger, better nourished, less stressed, and more comfortable in your body and mind. Good health is more than not being sick. When you are healthy, you enjoy many benefits. Good health is possessing the energy and motivation to seek the things you most want without the distractions or stresses of illness. Good health is being hardy and sound in body and mind. If you are in good health you are able to enjoy all the good things in life without guilt or shame because you are satisfied and confident in your ability to moderate your behaviors. Good health is being free of addictions and compulsions.
For more information read following article.
aia-vitality-your-guide-to-better-health-1

कधी कधी भाजी खाण्यास नको वाटते, तेव्हा चटणी चा स्वाद हवा हवासा वाटतो, चटणी, आरोग्यासही छान असते.
आवळ्याची चटणी- खाल्याने इम्यून सिस्टम चांगली असते, यात असलेल्या व्हिटॉमिन सी आणि अन्य पोषक घटकांमुळे शरीराच्या अनेक समस्यां दूर होतात. आवळ्याच्या चटणीत आले व लिंबू मिसळून खाल्याने हृदय रोगाच्या समस्यां दूर होतात.
टोमॉटोची चटणी – व्हिटामिन सी ,लाइकोपिन, पोट्याशियम अधिक प्रमाणात असल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म यात असतात. वजन कमी कणाऱ्यांसाठी हि चटणी लाभदायक आहे.
कांदा व लसणाची चटणी- लसणात अँटिबायोटिक अँटी फँगल आणि अँटी बॉक्टेरियल
गुणधर्म असतात. हे वयानुसार शरीरात होणारे बदल कमी करण्यास व आरोग्यास मदत करण्यास फायदेशीर आहे.
कढीपत्ता चटणी – या चटणीत लोह व फॉलिक ऍसिड अधिक प्रमाणात असते.तसेच यात कॅल्शियम व इतर व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे केस काळे व जाड आणि मजबूत होतात. शरीरातील रक्ताची कमी भरून काढण्यास त्याच बरोबर उंचच रक्तदाब व मधुमेह सारख्या समस्यां यां वर फायदेशीर आहे.
कोथिंबीरची चटणी — यात व्हिटॅमिन सी आणि प्रोटीन अधिक प्रमाणात असल्याने मधुमेह सारखे आजार दूर करण्यास मदत होते. तसेच पुदिन्याच्या चटणी मध्ये अँटी ब्यक्टेरिअल गुणधर्म असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. कोथिंबीर आलं आणि लसूणाची चटणी आतड्यांचे विकार ताप डायरिया यां सारख्या आजारावर फायदेशीर आहे.

The post आरोग्य appeared first on Marathi Unlimited.

एक विचार

$
0
0

A thought or collection of thoughts that generate in the mind. An idea is usually generated with intent, but can also be created unintentionally. Ideas often form during brainstorming sessions or through discussions.

For more information read following article.

 idea

आपल्या धनाचे,पैशाचे मालक बना रखवालदार नाही. जो आपला पैसे खर्च करू शकतो, किंवा कुणास मदत करू इच्छितो तोच मालक असतो, नाहीतर मालक असून तो रखवालदारच कार्य करतो म्हणजे तो होय.

तुम्हाला श्रीमंत बनायचे असेल तर तुम्ही धनिकांचा तिरस्कार करू नका. तिरस्कार करीत असाल तर तुम्ही श्रीमंत होऊ शकणार नाही.

The post एक विचार appeared first on Marathi Unlimited.

Viewing all 396 articles
Browse latest View live

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>