बाळासाहेब ठाकरे
जन्म – २३ जानेवारी १९२६ पुणे, महाराष्ट्र
मृत्यू – १७ नोवेंबर २०१२
राजकीय पक्ष – शिवसेना
पत्नी – मीनाताई ठाकरे
निवास – मातोश्री, कलानगर,वांद्रे मुंबई.
धर्म – हिंदू
बाळ केशव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार. महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारे एक लोकप्रिय नेते. महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असणारे नेते. शिवसेना सुप्रीमो बाळासाहेब ठाकरे. सामना या दैनिकाचे संस्थापक – संपादक बाळासाहेब ठाकरे.
बाळासाहेबांचे बालपण -
महाराष्ट्रातील पुणे येथे बाळासाहेबांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे त्यावेळी आपल्या लेखनातून तसेच इतर माध्यमातून लोकजागृतीचे कार्य करीत होते. तसेच त्यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही फार महत्वाचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांना नकळत पणे प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृतीचा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला आहे.
बाळासाहेबांनी एक व्यंगचित्रकार म्हणून आपल्या जीवनाला प्रारंभ केला. त्यासोबतच त्यांनी सामाजिक प्रश्नावर भास्य करण्यास सुरवात केली. १९५० मध्ये ते “फ्री प्रेस जर्नल” मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. त्या नंतरच्या काळात त्यांनी प्रसिद्ध व जेष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्षमण यांच्यासोबत काही काळ काम केले.
त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी फ्री प्रेस जनरल ची नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी मग १९६० मध्ये “मार्मिक” हे साप्ताहिक सुरु केले. साप्ताहिकाचे मार्मिक हे नाव त्यांना त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनीच सुचविले होते. “मार्मिक” हे मराठी माणसाचे मराठीमधील पहिलेच साप्ताहिक होते. “मार्मिक” या साप्तीहीकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. बाळासाहेबांनी मार्मिक ची स्तापणा हि महाराष्ट्रातील मराठी लोकांचा स्वाभिमान जगाविण्यासाठीच केली होती. मुंबईत मराठी माणसावर होणार्या आण्यायला मार्मिकनेच वाचा फोडली. महाराष्ट्रात येउन मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या लोकांना बाळासाहेबांनी सर्वप्रथम मार्मिकच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा पर्यंत केला. १९६० पासून तर आतापर्यंत मार्मिक हे मराठी माणसाच्या मनातील एक महातव्हाचे साप्ताहिक आहे.शिवसेना पक्षाची स्थापना
बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी महाराष्ट्रात शिवसेना पक्ष्ची स्थापना केली. त्यावेळी महाराष्ट्रात निर्माण झालेली , मराठी द्वेषाची व मराठी माणसावर होणारा अत्याचार हा केवळ व्यंग चित्रांनी दूर होणार नाही, म्हणून त्यासाठी आणखी पर्यंत करायला हवे आहे हे बाळासाहेबांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी मग “शिवसेना” पक्षाची स्थापना केली. “शिवसेना” हे नाव त्यांना त्यांच्या वडिलांनीच म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांनीच सुचविले होते. शिवसेना पक्षाच्या स्थापनेचा मागचा प्रमुख दृष्टीकोन होता तो ” हर हर महादेवाची” गर्जना प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अजून एकदा घुमायला हवी. प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राच्या इतिहासाचा स्वाभिमान आपल्या मनात बाळगायलाच हवा. म्हणून इ.स. १९ जून १९६६ ला महाराष्ट्रात शिवसेना पक्षाची स्थापना करण्यात आली.
त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरही आपले वविचा रोखठोक मांडायला सुरवात केली. बॉम्बस्पोठ, देशविघातक कृत्ये घडून आणणाऱ्या देशद्रोही लोकांना या देशात राहण्याचा काहीही अधिकार नाही. जातीवर आधारित घाणेरडे राजकारण कुणीही करू नये, भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मास्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही . अशा प्रकारचे एकदम रोखठोक विचार बाळासाहेब ठाकरे शिवासैनिकांसमोर व सामान्य जनते समोर मांडत असत. या त्यांच्या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच “हिंदुसाम्राठ” हि त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. “गर्व से कहो हम हिंदू है ” या घोषणेला खरा आर्थ प्राप्त झाला तो महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच.शिवसेना भाजप युती -
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुळेच महाराष्ट्रात शिवसेना – भा.ज.प.युती आकाराला आली आहे. त्यानंतर शिवसेना सुप्रीमो बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावाती सभांमुळे इ.स. १९९५ मध्ये महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन झाले. आणि मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झालेत.Shiv Sena supremo Balasaheb Thackeray, Bal Keshav Thackeray was an Indian politician who founded the Shiv Sena, a right-wing Marathi ethnocentric party active mainly in the western India’s Maharashtra. His followers called him the Hindu Hriday Samraat.
The post हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.